शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कोरोनाची साथ दोन वर्षांच्या आत संपण्याची शक्यता; जागतिक आरोग्य संघटनेला आशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:37 IST

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनोम घेब्रिसिस म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत.

जिनिव्हा : कोरोनाची साथ येत्या दोन वर्षांच्या आत संपुष्टात येईल, अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनोम घेब्रिसिस यांनी व्यक्त केली आहे. १९१८ साली आलेली स्पॅनिश फ्लूची साथदेखील दोन वर्षांत ओसरली, याची त्यांनी आवर्जून आठवण करून दिली.

घेब्रिसिस यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, कोणत्याही साथीचा मुकाबला करण्यासाठी आता जगाकडे सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञान आहे. सध्या जग खूप जवळ आले आहे, तसेच एका ठिकाणाहून लोक खूप कमी वेळेत दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतात. प्रवासाची साधनेही जलद झाली आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा फैलावही तितक्याच जलद गतीने होत आहे. मात्र, या विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रगत उपाय आपल्याकडे आहेत. त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड आहे. कोरोनाच्या आजाराबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी शास्त्रज्ञ विविध प्रकारचे प्रयोग करीत आहेत.

अधनोम घेब्रिसिस यांनी सांगितले की, जागतिकीकरणामुळे जग जवळ आले, त्याचे काही तोटे, तर काही फायदे झाले आहेत. पूर्वीच्या काळी तंत्रज्ञान फारसे प्रगत नव्हते. १९१८ साली आलेली स्पॅनिश फ्लूची साथ दोन वर्षांतच पूर्णपणे ओसरली होती. कोरोनाची साथही दोन वर्षांच्या आत संपण्याची शक्यता आहे.नियमांचे काटेकोर पालन कराजागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख अधनोम घेब्रिसिस म्हणाले की, कोरोना प्रतिबंधक लस बनविण्यासाठी जगातील सर्व देशांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या हातात असलेल्या साधनांचा वापर करून कोरोना साथीवर नियंत्रण मिळविले पाहिजे. त्या साधनांमध्ये कोरोना प्रतिबंधक लसीचाही समावेश होतो. एकट्या कोरोना लसीमुळेच ही साथ संपुष्टात येईल, या भ्रमात कोणीही राहू नये. लोकांनी फिजिकल डिस्टन्सिंग पाळायला हवे व मास्क घालायला हवा. या नियमांचे काटेकोर पालन केले, तरच ही साथ नियंत्रणात येईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना