शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: फायद्याची बातमी! कोरोना काळात लहान मुलांच्या ताण-तणावाला कसे कमी करता येईल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2021 07:15 IST

तिसरी लाट मुलांवर धडकणार! याची दहशत लहान मुलांनासुद्धा बसल्याचे जाणवते.मुलांना खाटा, ऑक्सिजन मिळेल का? असं काही पालकांनी बोलून दाखवलं

डॉ. मंगला बोरकर, प्राध्यापक, जेरियाट्रिक्स, शासकीय वैद्यकीय रुग्णालय व महाविद्यालय (घाटी), औरंगाबाद

तिसरी लाट मुलांवर धडकणार! याची दहशत लहान मुलांनासुद्धा बसल्याचे जाणवते.मुलांना खाटा, ऑक्सिजन मिळेल का? असं काही पालकांनी बोलून दाखवलं; पण तशी वेळच कशाला येऊ द्यायची? आपण लस, मास्क, गर्दी टाळणे असे केले तर मुलांचं संरक्षण होईल.

डॉ. संजीव सावजी,मानसोपचार तज्ज्ञ

  1. सध्या लहान मुलांच्या ताण-तणावाला कसे कमी करता येईल?
  2. त्यांची शाळा, सुटीतील मौज, फिरणे, मित्रांबरोबर खेळणं सगळच बंद झालं. त्यामुळे पालकांनीच नवीन नवीन युक्त्या शोधून, काम सांभाळून मुलांना गुंतवून ठेवायला हवं.
  3. ज्या आई-वडिलांकडे स्मार्टफोन नाही किंवा एकच आहे, त्यांनी मुलांच्या अभ्यासाचं कसं करायचं?
  4. शाळेला सुट्टी असली की मजा वाटते; पण ती महिनोमहिने चालत राहिली तर मात्र मुलांना अनेक गोष्टींपासून वंचित राहावं लागतं.
  5. मुलांना आपल्या कामात सहभागी करून घ्या.
  6. जमेल तितकं मीडियापासून दूर ठेवा. व्यायाम, घरातल्या घरात खेळणं, गाणी, नवीन कौशल्य यांची आवड लावा. आपलं मुल जर आजरी पडलं तर त्याला बरं करण्यासाठी आपण आकाश पाताळ एक करू. मग याच्यापेक्षा त्याला आजारच नाही होणार याच्यासाठी दक्षता घेतली तर?
  7. स्वत: प्रयत्नपूर्वक सकारात्मक राहा म्हणजे तेही राहतील.  

डॉ. प्रसाद देशपांडे, प्राध्यापक, मानसोपचार विभाग,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद

  1. वर्षभरात महिला, मुलांवर अत्याचार तसेच पुरुषांमध्ये व्यसनांचे प्रमाण वाढले आहेत.
  2. आई-वडिलांच्या नैराश्य, भांडणाचा मुलांवर दुष्परिणाम होतो.
  3. मुलांच्या हातात मोबाइल गेल्यामुळे गैरवापर होऊ शकतो.
  4. मीडियामध्ये कोरोनाच्या बातम्यांचा भडीमार, आप्तांमधील कोरोनामुळे आजार, मृत्यूचा कोवळ्या मनांवर आघात होतो. 
  5. घरातील आर्थिक अडचणींचा मुलांवरही ताण होतो.
  6. बंदिस्त राहण्यामुळे कोंडमारा होतो.
  7. पालकांच्या चिडचिडेपणामुळे मुलं अस्वस्थ होतात.
  8. पालकांनी संयम दाखवून व्यायाम, योगासने, यांचा उपयोग करून मुलांची मानसिक स्थिती संतुलित ठेवायला हवी. जिवंत असल्याची कृतज्ञता, भविष्यकाळाचा आशावाद मुलांच्या मनात जागवायला हवा. 
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या