शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनामुक्त झालेल्यांचे दात पडू लागल्यानं चिंतेत वाढ; डॉक्टरांसह सगळेच हैराण

By कुणाल गवाणकर | Updated: December 22, 2020 09:44 IST

CoronaVirus News: कोरोनावर मात केलेल्यांना सतावतेय नवीन समस्या; डॉक्टरांनी दिला धोक्याचा इशारा

मुंबई: संपूर्ण जगात कोरोनाचा कहर सुरुच आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही देशांनी लसीकरणास सुरुवात केली आहे. अमेरिका, ब्रिटन सरकारनं लसीकरणास परवानगी दिली आहे. त्यातच आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक असल्यानं संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमानं रोखण्याचा निर्णय घेतला आहे.एकीकडे कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला असताना दुसरीकडे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संकट पाहून दातखिळीच बसली, असं आपण अनेकदा म्हणतो. मात्र कोरोनामुळे आलेल्या नव्या संकटामुळे आता तसंदेखील म्हणण्याची सोय उरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण होत आहे. माणसाच्या फुफ्फुसांवर थेट हल्ला चढवणाऱ्या कोरोनानं आता दातांवर आक्रमण केलं आहे. काही कोरोना बाधितांचे दात कमजोर होत असून ते पडत असल्याचं वृत्त 'न्यूयॉर्क टाईम्स'नं दिलं आहे.सतत मास्कचा वापर करणं ठरू शकतं नुकसानकारक; डॉक्टरांनी सांगितले 'हे' दुष्परिणामकाय आहे संपूर्ण घटना?न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास असलेल्या ४३ वर्षीय फराह खेमिली यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून त्या पूर्ण बऱ्या झाल्या. मात्र एके दिवशी त्यांना दातांमध्ये तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी दातांना हात लावून पाहिला. त्यावेळी एक दात हलत असल्याचं लक्षात आलं. दुसऱ्याच दिवशी फराह यांचा दात पडला. हे पाहून त्यांना धक्काच बसला. विशेष म्हणजे दात पडताना त्यांना कोणतीही वेदना जाणवली नाही आणि रक्तस्रावदेखील झाला नाही.आधीपेक्षा जास्त घातक ठरू शकतो कोरोनाचा नवा स्ट्रेन; संसर्गाची तीव्रता ७० टक्क्यांनी वाढली, तज्ज्ञांचा दावासंशोधक आणि दंतचिकित्सकांमध्ये मतमतांतरंया घटनेनंतर संशोधकांनी यावर संशोधन सुरू केलं. कोरोनाची लागण झाल्याचा परिणाम दातांवर होतो, अशी कोणतीही बाब अद्याप तरी संशोधनातून समोर आलेली नाही, असं संशोधकांनी सांगितलं. मात्र कोरोना विषाणूचा परिणाम दातांवर होतो, असं मत काही दंतचिकित्सकांनी व्यक्त केलं. मात्र त्यांच्याकडे याचा कोणताही पुरावा नाही.याशिवाय कोरोनावर मात केलेल्या न्यूयॉर्कमधील काही जणांना केसगळतीचा त्रास होऊ लागला आहे. याशिवाय काहींच्या पायांची बोटं सुजली आहेत.दात पडणं गंभीर समस्याएखाद्या व्यक्तीचा दात अचानक पडणं अतिशय आश्चर्यजनक असल्याचं मत उटाह विद्यापीठातील पीरियडॉन्टिक्स डॉ. डेव्हिड ओकानो यांनी व्यक्त केलं. ही समस्या पुढे आणखी गंभीर स्वरुप धारण करू शकते, असा धोक्याचा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या