शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

चिंताजनक! कोरोना विषाणू संसर्गामुळे शुक्राणू निर्मितीत घट, वैद्यकीय तज्ज्ञांचे निरीक्षण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 07:41 IST

Coronavirus & Sexual Health: कोविडच्या संसर्गामुळे शुक्राणू निर्मितीच्या क्षमतेत घट झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नुकतेच मांडले आहे. शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया पूर्ववत होण्यासाठी २ ते ३ महिने लागत असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले आहे.

- स्नेहा मोरेमुंबई : कोविडच्या संसर्गामुळे शुक्राणू निर्मितीच्या क्षमतेत घट झाल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नुकतेच मांडले आहे. (Coronavirus & Sexual Health) शुक्राणू निर्मितीची प्रक्रिया पूर्ववत होण्यासाठी २ ते ३ महिने लागत असल्याचेही डॉक्टरांनी नमूद केले आहे. ( Coronavirus infection reduces sperm production, medical experts observe)

यापूर्वी, जागतिक पातळीवर केलेल्या अभ्यासाद्वारे एचआयव्ही, हेपेटायटिस सी, इबोला यांसारखे आजार शुक्राणू निर्मितीवर परिणाम करत असल्याचे आढळले आहे. यामुळे हार्मोन्स बदल, शुक्राणूची पातळी कमी-जास्त होणे यांसारखे बदल दिसून आले आहेत. याचप्रमाणे आता कोविडमुक्तीनंतर अशा स्वरूपाचे बदल होत असल्याचे दिसून आले आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे ताप येतो, या तापामुळे पोस्ट कोरोना स्थितीत हा संसर्ग होतो. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये शुक्राणू कमी होतात, परंतु ही स्थिती तात्पुरत्या काळासाठी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. परिणामी, आयव्हीएफ प्रक्रियेचे उपचार घेणाऱ्या दाम्पत्यांना या शुक्राणूच्या कमतरतेमुळे उपचार पुढे ढकलण्याचा सल्ला दिला जातो, अशी माहिती क्लिनिकल डायरेक्टर कन्संलटंट रिप्रॉडक्टटिव्ह मेडिसीनचे डॉ. रिचा जगताप यांनी दिली. इंदिरा आयव्हीएफचे सहसंस्थापक डॉ. क्षितीज मुरदिया यांनी सांगितले, महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये कोविडच्या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. बाधित होणाऱ्या पुरुष रुग्णांमध्ये शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेवर तात्पुरत्या कालावधीकरिता परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. मात्र हा दुष्परिणाम कायमस्वरूपी नसून ठराविक काळासाठी आहे. कोविड रुग्णांमध्ये ताप अधिक येत असल्याचे दिसून येते, त्यामुळे पुरुषांच्या रिप्रोडक्शन ट्रॅक्टवर परिणाम होतो.

काही काळासाठी कमी प्रमाणनॅशनल इन्स्टिट्यूट फोर रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थच्या अभ्यास अहवालानुसार, पुरुषांमध्ये कोविडमुक्तीनंतर शुक्राणू कमी निर्मित होतात. मात्र योग्य वैद्यकीय सल्ला व औषधोपचारानंतर काही काळाने ही प्रक्रिया पूर्ववत होते असे दिसून आले आहे.  

ताण, नैराश्याने बदल- सेक्साॅलाॅजिस्टच्या निरीक्षणानुसार, कोरोना उपचार प्रक्रियेत ताण आणि नैराश्यामुळे रुग्णाच्या मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. - त्यामुळै लैंगिक क्षमतेवरही काही काळ दुष्परिणाम होतो परंतु, वैद्यकीय सल्ल्यानंतर रुग्णाला बरे वाटते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य