शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

 CoronaVaccine: कोरोनाविरोधात या लसीचा एक डोसदेखील पुरेसा; भारतातही आहे उपलब्ध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 15:48 IST

Sputnik V single dose enough: खरेतर कोरोना लसीचे दोन डोस कोरोनाविरोधात लढण्यास जास्त परिणामकारक असल्याचे आढळले आहे. मात्र, देशातील ४ टक्के लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आहेत. अनेक ठिकाणी लसीसाठी मारमारी आहे. अनेकांना कोव्हॅक्सिनचे ३० दिवस किंवा कोव्हिशिल्डचे ८४ दिवस होऊन गेले तरी दुसरा डोस मिळालेला नाहीय.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या (Corona third wave) शक्यतेने जगाला मोठ्या संकटात टाकले आहे. डेल्टा व्हेरिअंट १२० हून अधिक देशांमध्ये आढळल्याने खळबळ उडालेली आहे. दुसरीकडे कोरोना लसीची (Corona Vaccine) प्रचंड टंचाई भारतासह जगभरातील देशांना सतावू लागली आहे. यामुळे कोरोनाला कसे थोपवायचे असा प्रश्न मोठमोठ्या तज्ज्ञांना पडलेला असताना एक दिलासा देणारे संशोधन समोर आले आहे. एका देशाच्या कोरोना लसीचा एकच डोस (Corona vaccine single dose) कोरोनाविरोधात लढण्यास पुरेसा असल्याचे आढळले आहे. महत्वाचे म्हणजे ही लस भारतात देखील उपलब्ध आहे. (Single dose of Sputnik V Covid vaccine triggers strong antibody response: Study) 

Sputnik V Exclusive: रशियात राहणाऱ्या ठाणेकरानं घेतलेत Sputnik V चे दोन्ही डोस; जाणून घ्या त्यांचा अनुभव अन् लसीचे साईड इफेक्टखरेतर कोरोना लसीचे दोन डोस कोरोनाविरोधात लढण्यास जास्त परिणामकारक असल्याचे आढळले आहे. मात्र, देशातील ४ टक्के लोकांनाच लसीचे दोन डोस मिळाले आहेत. अनेक ठिकाणी लसीसाठी मारमारी आहे. अनेकांना कोव्हॅक्सिनचे ३० दिवस किंवा कोव्हिशिल्डचे ८४ दिवस होऊन गेले तरी दुसरा डोस मिळालेला नाहीय. आलेच तर 100 ते 200 डोस प्रत्येक केंद्रावर मिळत आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या बुस्टर डोस देण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञ देत आहेत. आधीच पहिला, दुसरा डोस मिळालेला नसताना तिसरा डोस कुठून देणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सेल रिपोर्ट्स मेडिसिन जर्नलने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासामध्ये रशियाची लस स्पुतनिक व्हीचा (Sputnik V) एक डोस कोरोना विरोधात जबरदस्त अँटीबॉडी बनविते असे समोर आले आहे. हा अभ्यास लसीची टंचाई असलेल्या देशांसाठी महत्वाचा ठरणार आहे. भारतासाठी देखील हे महत्वाचे आहे, कारण स्पुतनिक व्ही ची लस मिळू लागली आहे. तसेच चार-पाच कंपन्या ही लस बनविणार आहेत. 

Covishield: डेल्टा व्हेरिअंट 'बकासूर'! कोव्हिशिल्ड घेतलेल्यांना तिसरा डोस द्यावा लागेल; ICMR चा सल्ला

व्हेक्टर व्हॅक्सिन स्पुतनिकचे दोन डोस कोरोना संक्रमणाविरोधात 92 टक्के परिणामकारक आहे. परंतू एक डोस देखील चांगले परिणाम दाखवत असल्याचे दिसले आहे. संशोधकांनी अर्जेंटीनाच्या 289 आरोग्य कर्मचाऱ्यांवर स्पुतनिकच्या एक आणि दोन डोसच्या प्रभावाची तुलना केली. यामध्ये कोरोना संक्रमित न झालेल्यांना दुसऱ्या डोसनंतर तीन आठवड्यांनी विशिष्ट इम्युनोग्लोबुलिन जी (आईजीजी) अँटीबॉडी निर्माण झाल्या. तर पहिला डोस घेतलेल्यांपैकी 94 टक्के लोकांमध्ये ही अँटीबॉडी बनली. यामुळे या लसीचा एक डोस देखील कोरोना विरोधात लढण्यास पुरेसा ठरणार असल्याचे मत या तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याrussiaरशिया