शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine: गुड न्यूज! मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लसीची यशस्वी चाचणी; एकाचवेळी दोन्ही हातांना मिळणार लस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2021 07:29 IST

या चाचणीसाठी रुग्णालयाने २ हजार ७३७ सुदृढ लोकांची निवड केली. या सर्व लोकांना लस देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसेंट जाॅर्ज रुग्णालयात ‘झायकोव्ह-डी’ची चाचणी; सकारात्मक परिणाम समोर; २ हजार ७३७ जणांनी घेतली लसझायकोव्ह-डी ही एक सुईशिवाय घ्यावी लागणारी लस आहे. ही इंट्रा-डर्मल लस आहे,पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा २८ व्या दिवशी आणि तिसरा ५२ व्या दिवशी घ्यावा लागतो.

मुंबई : कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक लसींची लसीकरण मोहीम वेगाने सुरू आहे. मात्र, जगभरात अजूनही कोरोनाला हरविण्यासाठी औषधोपचार आणि लसींचे संशोधन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून झायडसने बनविलेल्या झायकोव्ह-डी(Zycod-D vaccine) लसीची चाचणी देशभरात सुरू आहे. या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात जे. जे. समूहाच्या सेंट जाॅर्ज रुग्णालयात झायकोव्ह-डी लसीची चाचणी सुरू असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

या चाचणीसाठी रुग्णालयाने २ हजार ७३७ सुदृढ लोकांची निवड केली. या सर्व लोकांना लस देण्यात आली आहे. लस दिल्याच्या पाच महिन्यांनंतर फक्त २२ लोकांना संसर्गाची बाधा झाल्याचे समोर आले. मात्र, चांगली गोष्ट अशी आहे की आजपर्यंत कोणतेही गंभीर दुष्परिणाम दिसलेले नाहीत आणि ही लस घेतल्यानंतर संक्रमित झालेल्या व्यक्तींना फक्त सौम्य आणि मध्यम लक्षणे दिसली आहेत. या संशोधनाचे नेतृत्व करणारे सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांनी सांगितले, झायकोव्ह-डी ही एक सुईशिवाय घ्यावी लागणारी लस आहे. ही इंट्रा-डर्मल लस आहे, ज्यास स्नायूंमध्ये इंजेक्शनची लावण्याची आवश्यकता नसते. या लसीचे तीन डोस घ्यावे लागतात. पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा २८ व्या दिवशी आणि तिसरा ५२ व्या दिवशी घ्यावा लागतो. एकावेळी दोन्ही हातांना ०.२ मिली एवढ्या प्रमाणात लस दिली जाते. 

कोणतेही दुष्परिणाम नाहीतलस घेतल्यानंतर लोकांना कोणतेही गंभीर दुष्परिणाम नसल्याचे सांगितले. १५ फेब्रुवारी चाचणी सुरू केली असून या चाचणीत केवळ असेच लोक घेतले गेले ज्यांचा आरटीपीसीआर आणि अँटीबॉडीजचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या लस चाचणीचे नुकतेच पाच फॉलोअप पूर्ण केले आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या