शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
3
थकलेले चेहरे, कंटाळवाणा मूड.. विराट-रोहितसह सारेच हैराण! ऑस्ट्रेलियात पोहचण्याआधी काय घडलं?
4
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
5
जगातील नकाशात कुठे आहे रहस्यमय 'टोरेंजा' देश?; महिलेचा पासपोर्ट पाहून खळबळ, व्हिडिओ व्हायरल
6
TVS ने लॉन्च केली पहिली दमदार अ‍ॅडव्हेंचर टूरिंग बाईक; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत...
7
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
8
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
9
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
10
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
11
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
12
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
13
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
14
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
15
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
16
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
17
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
18
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
19
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
20
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...

Omicron Variant : ओमायक्रॉन बाधितांना श्वासाचा किती त्रास होतो? मृत्यूचा धोका किती? खुद्द द.आफ्रिकेतील डॉक्टरांनीच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 13:20 IST

प्रिटोरिया येथे द स्टिव्ह बायको आणि शॉने जिल्हा रुग्णालयात 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 166 नवे रुग्ण दाखल करण्यात आले होते. यांपैकी 42 रुग्ण अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत.

कोरोना विषाणूच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटच्या रुग्णांत झपाट्याने वाढत होत आहे. यातच, दक्षिण आफ्रिकेच्या ओमायक्रॉन एपिसेंटरमधील एका मोठ्या रुग्णालयातील प्राथमिक आकडेवारीनुसार, असे दिसून येते, की येथील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. मात्र, रुग्णांना क्वचितच गंभीर वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासत आहे.

प्रिटोरिया येथे द स्टिव्ह बायको आणि शॉने जिल्हा रुग्णालयात 14 ते 29 नोव्हेंबर दरम्यान 166 नवे रुग्ण दाखल करण्यात आले होते. यांपैकी 42 रुग्ण अद्यापही रुग्णालयात दाखल आहेत. सक्षिण आफ्रिकन मेडिकल रिसर्च काउंसिल आणि स्टिव्ह बायको रुग्णालयात इंफेक्शिअस डिसीज डॉक्टर फरीद अब्दुल्लाह यांनी या रुग्णांत दिसून येणारी लक्षणे आणि त्यांची स्थिती बारकाईने अभ्यासली आहे. तसे, एपिसेंटरमध्ये साधारणपणे बहुतांश नवे रुग्ण ओमायक्रॉन व्हेरिअंट प्रभावित आहेत, अशी पुष्टी नॅशनल इंस्टिट्यूट फॉर कम्यूनिकेबल डिसीजने केली होती.

रुग्णांतील लक्षणे आणि त्यांची प्रकृती - अहवालानुसार, कोरोना वॉर्डमध्ये दाखल झालेल्या बहुतेक रुग्णांना पूर्वी प्रमाणे ऑक्सिजनची गरज भासली नाही. 2 डिसेंबर रोजी एकूण 38 रुग्णांना दाखल करण्यात आले होते. या 38 प्रौढांपैकी, 6 जणांचे लसीकरण झाले होते. तर 24 जणांचे लसीकरण झालेले नव्हते आणि 8 लोक होते ज्यांच्या लसीकरणासंदर्भात माहिती मिळाली नाही. पूर्णपणे लसीकरण झाले केवळ एका व्यक्तीलाच ऑक्सिजनवर ठेवण्यात आले होते. मात्र, फुफ्फुसात पल्मोनरी डिसीज झालेला असल्याने उपचाराची गरज भासली. या दोन आठवड्यांत केवळ दोनच लोकांना अतिदक्षता विभागात ठेवण्याची गरज पडली.

कोरोना वॉर्डमध्ये भरती असलेल्या रुग्णांत जवळपास 19 टक्के रुग्ण 9 वर्षांपेक्षा अधिक वय असलेली मुले होती. तर 28 टक्के रुग्णांचे वय 30 ते 39 वर्षांच्या आत होते. कोरोना वॉर्डच्या अहवालानुसार, गेल्या दोन आठवड्यांत येथे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तसेच, गेल्या 18 महिन्यांतील एकूण मृत्यूंमध्ये मुलांचे प्रमाण 17 टक्के एवढे आहे. येथे आतापर्यंत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याचे कारण ओमायक्रॉन नसल्याचे मानले जाते. मृतांचा आकडाही वाढू शकतो. येत्या दोन आठवड्यांत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. भविष्यातील परिस्थिती कशी असेल, हे समजण्यासाठी एवढा वेळ पुरेसा आहे. गेल्या, 18 महिन्यांत कोरोना वॉर्डमध्ये अॅडमिट रहण्याचे प्रमाण साधारणपणे 2.8 ते 8.5 दिवस एवढे होते.

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्याSouth Africaद. आफ्रिका