शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

CoronaVirus : कोरोनाचा पुढचा व्हेरिअंट वाढवणार टेन्शन, WHO नं दिला मोठा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 15:56 IST

जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) वेळो-वेळी कोरोना स्थिती, नवे व्हेरिअंट आणि त्यांची संक्रमकता यासंदर्भात अपडेट देत आहे.

भारतासह संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचे अनेक व्हेरिअंट समोर आले आहेत. या व्हेरिअंटमुळे वाढणाऱ्या रुग्णसंख्येने पुन्हा एकदा देशासह जगाचेही टेन्शन वाढवायला सुरुवात केली आहे. भारतात काही राज्यांनी पुन्हा एकदा मास्क बंधनकारक केले असून आरोग्य विभाग कोरोना प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेऊन आहे. याशिवाय, जागतिक आरोग्य संघटनाही (WHO) वेळो-वेळी कोरोना स्थिती, नवे व्हेरिअंट आणि त्यांची संक्रमकता यासंदर्भात अपडेट देत आहे.

WHO ने नुकताच मोठा इशारा दिला आहे. कोरोनाचा पुढचा व्हेरिअंट टेन्शन वाढवू शकतो, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. WHO एपिडेमियोलॉजिस्ट Dr. Maria Van Kerkhove म्हणाल्या, सध्या जगभरात ओमायक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण आहेत. याच बरोबर आम्ही याचे सबव्हेरिअंट BA.4, BA.5, BA.2.12.1 यांवरही लक्ष ठेवून आहोत.

पुढचा व्हेरिअंट कोणता असेल? -जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की कोरोना व्हायरसचा पुढचा व्हेरिअंट कोणता असेल, हे सांगणे अवघड आहे. आमच्यासाठी हा एक चिंतेचा विषय आहे. आता आपण वेगवेगळ्या परिस्थितीनुसार प्लॅन तयार करायला हवा. आपल्याकडे जीव वाचवू शकेल असे तत्रज्ञान आहे. मात्र, त्याचा नियोजनबद्ध पद्धतीने वापर करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या तरी लस हेच या आजारावरील रामबान औषध आहे. 

धोका आणखी टळलेला नाही - डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अॅधानोम घेब्रेयसस (Tedros Adhanom Ghebreyesus) म्हणाले, टेस्टिंग कमी झाल्याने कोरोनाच्या धोक्याकडे लोकांचे दुर्लक्ष झाले आहे. कोरोना मृतांच्या संख्येत झालेली घट, ही नक्कीच दिलासादायक गोष्ट आहे. याचे स्वागत करायला हवे. मात्र, ही घट कमी टेस्टिंगमुळेही झालेली असू शकते. कमी होत चाललेल्या आकडेवारीने आपल्याला आंधळे बनवले आहे. खरे तर या घातक व्हायरसचा धोका अद्यापही कायम आहे आणि तो अजूनही लोकांचे बळी घेत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाCorona vaccineकोरोनाची लस