शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

कोरोनाचा उपप्रकार डेंजर, सतर्क राहा, तज्ज्ञांचे मत; लसीकरणामुळे दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2023 10:05 IST

Corona : राज्य कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की,    नवा उपप्रकार देशासाठी किती घातक आहे, हे आताच सांगणे अवघड आहे.

मुंबई : कोरोनाचा कोणताही नवीन उपप्रकार सापडलेला नाही. त्यामुळे काळजी नसावी, असे मत आतापर्यंत आरोग्य व्यवस्थेतील तज्ज्ञ व्यक्त करत होते. मात्र नवीन वर्ष सुरू व्हायला काही तास बाकी असताना धोकादायक ‘एक्सबीबी. १.५’ हा ओमायक्रॉन विषाणूचा उपप्रकार आढळून आला. गुजरातमध्ये या उपप्रकाराचा पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे खबरदारी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.   राज्य कोरोना कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की,    नवा उपप्रकार देशासाठी किती घातक आहे, हे आताच सांगणे अवघड आहे. कारण आपल्या देशात सध्याच्या घडीला ‘एक्सबीबी. १.५’  उपप्रकाराचा एकच  रुग्ण आढळला आहे.  अमेरिकेत या उपप्रकाराचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. मात्र आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या आजाराशी लढण्यासाठी आवश्यक असणारी  अँटीबॉडीज आहेत. खबरदारी घेणे आवश्यक असून, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा. केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या मते, दरवेळी मार्चमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढते. त्यामुळे यंदाही संसर्ग होईल. रुग्णसंख्याही वाढेल. मात्र आरोग्यावर गंभीर परिणाम होणार नाहीत.  

आम्ही विषाणूच्या जेनेटिक फूटप्रिंट्सवर नजर ठेवून आहोत. राज्य १०० टक्के जिनोमिक सिक्वेन्सिंग करीत आहे. महाराष्ट्रात एक्सबीबी उपप्रकाराचा  २७५ जणांना संसर्ग झाला होता. मात्र, एक्सबीबी १.५ हा उपप्रकार  वेगळा असून, त्याची फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. एक्सबीबी परिवारातील असल्यामुळे त्याचा किरकोळ परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- डॉ. प्रदीप आवटे, सर्वेक्षण अधिकारी, आरोग्य विभाग.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या