शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

सक्षम आरोग्यव्यवस्था हा मूलभूत अधिकार; यशस्वी लढ्यासाठी दीर्घकालीन उपायांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 02:51 IST

भविष्यातही जनमानसात आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य व्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे.

मुंबई : यंत्रणा म्हणून राज्यातील आरोग्य व्यवस्था कोरोना संकटाशी खंबीरपणे दोन हात करीत आहे. पण आरोग्य यंत्रणेतील अनेक उणिवाही याच काळात दिसू लागल्या आहेत. राज्याची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था जर्जर स्थितीत आहे, असे खेदाने नमूद करावे लागेल. आरोग्याला मूलभूत अधिकाराचा दर्जा देऊन, प्रतिबंधात्मक उपायांची गरज ओळखून; तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण व सार्वजनिक आरोग्यसेवा अद्ययावत करून आपण या परिस्थितीतून बाहेर येऊ शकतो, असे मत आरोग्यसेवा चळवळीतील कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

जीडीपीच्या जेमतेम सुमारे १.६ टक्केच खर्च आरोग्यावर होतो. सर्वसाधारण मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांचा विचार केल्यास महिन्याच्या अंदाजपत्रकात आरोग्यासाठी तरतूद बहुतांश वेळा नसते. गेल्या काही वर्षांत आरोग्य विम्याच्या माध्यमातून ही तरतूद केली जाते; परंतु त्याचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत नगण्य आहे. सामाजिक जीवनात अनेकविध विषयांवर आंदोलने होताना पाहतो, वाचतो; परंतु सुसज्ज सार्वजनिक रुग्णालय व्हावे या कारणासाठी एखादे आंदोलन झाल्याचे कितीदा निदर्शनास येते? कोरोनाचा विचार न करता समग्र आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार झाल्यास भविष्यात येऊ शकणाऱ्या संकटांनाही सामोरे जाण्याची सिद्धता आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे असेल, असे मत जनआरोग्य अभियानाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. अनंत फडके यांनी व्यक्त केले.

भविष्यातही जनमानसात आरोग्यविषयक जागरूकता वाढविण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्य व्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीची गरज आहे. Prevention is better than cure हे ब्रीद शालेय वयात घोकून घेण्यापेक्षा त्यादृष्टीने प्रत्यक्ष शिक्षण अधिक प्रभावशाली ठरू शकेल. चीनमध्ये पूर्वी राबवलेल्या bare foot doctors या संकल्पनेच्या धर्तीवर आजची शाळकरी मुले ही उद्याचे ‘आरोग्यदूत’ ठरतील, अशा पद्धतीने धोरण आखावे लागेल, असे निरीक्षण जन आरोग्य अभियानाचे डॉ. अभिजित मोरे यांनी मांडले.आपल्याकडे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची रचना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालय अशी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निर्धारित १०७ तत्त्वांनुसार तपासणी केली, तर किती केंद्रे निकषांची पूर्तता करतात, हे पाहणे गरजेचे आहे. तेथील सुविधा व डॉक्टरांची उपलब्धता कागदोपत्री नव्हे तर, सतत्येने पडताळणे गरजेचे असे मत डॉ. श्रीकला सहानी यांनी मांडले.सुधारणेसाठी वावसार्वजनिक आरोग्याची संसाधने लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशी आहेत, सामान्यांच्या आरोग्यासाठीच्या व्यवस्थेने काळानुरूप कात टाकली आहे का, हा चर्चेचा विषय ठरू शकतो. या प्रचलित आरोग्य व्यवस्थेत सुधारणेसाठी निश्चित वाव असल्याचे आरोग्यसेवा चळवळीतील तज्ज्ञ डॉ. श्रीकला सहानी म्हणाल्या.

टॅग्स :Healthआरोग्य