शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
5
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
6
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
7
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
8
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
9
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
10
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
11
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
12
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
13
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
14
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
15
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
16
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
17
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
18
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
19
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
20
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही घेतलेले औषध खरे आहे की बनावट? QR कोडद्वारे झटक्यात समजणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2022 19:32 IST

Medicine : सुरुवातीला बार कोड किंवा क्यूआर कोड सर्वाधिक विक्री होणाऱ्या 300 ब्रँडवर प्रिंट केला जाईल.

नवी दिल्ली : मेडिकल स्टोअर्स किंवा कोणत्याही ऑनलाइन पोर्टलवरून खरेदी केलेली औषधे (Medicine) खरी आहेत की बनावट हे जाणून घेणे सध्या खूप कठीण काम आहे. पण, येत्या काळात तुम्हाला औषधांच्या दर्जाविषयी किंवा गुववत्तेविषयी लगेच माहिती मिळणार आहे. सरकार औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या औषधांच्या पॅकेटवर बार कोड किंवा क्यूआर कोड छापणे बंधनकारक करणार आहे. 

सुरुवातीला बार कोड किंवा क्यूआर कोड सर्वाधिक विक्री होणाऱ्या 300 ब्रँडवर प्रिंट केला जाईल. बार कोड किंवा क्यूआर कोड प्रिंट केल्यावर, औषध खरेदीदार आपल्या मोबाइलवरून कोड स्कॅन करू शकतो की, ते औषध खरे आहे की बनावट आहे. News18.com ने दिलेल्या वृत्तानुसार, कोणत्याही किंमतीत बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट औषधांना आळा घालण्याचा सरकारचा हेतू आहे. या घडामोडीची माहिती असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने News18.com ला सांगितले की, सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि येत्या काही आठवड्यांत यासंबंधी अंमलबजावणी केली जाईल. 

जगात विकली जाणारी 35 टक्के बनावट औषधे भारतात तयार होतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार समजते. येत्या काळात बारकोड छापणे बंधनकारक होणार असल्याने टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. आधी काही निवडक औषधे बारकोडिंग करून बाजारात आणली जातील आणि त्यानंतर संपूर्ण फार्मा इंडस्ट्रीवर हा नियम लागू केला जाईल. त्यासाठी इंडस्ट्रीशी संबंधित लोकांशी चर्चा केली जात आहे. पहिल्या टप्प्यात 300 ब्रँडची यादी जारी केली जाईल जे क्यूआर कोड किंवा बार कोडचा अवलंब करतील.

या ब्रँड्समध्ये अॅलेग्रा, डोलो, ऑगमेंटिन, सॅरिडॉन, कॅलपोल आणि थायरोनॉर्म या भारतीय फार्मा मार्केटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणार्‍या लोकप्रिय औषधांचा समावेश आहे. पहिला टप्पा सुरळीतपणे पूर्ण झाल्यानंतर, त्याच्या पुनरावलोकनानंतर, जवळजवळ सर्व सर्वाधिक विक्री होणाऱ्या औषधांसाठी ते अनिवार्य केले जाईल. सरकार संपूर्ण फार्मा इंडस्ट्रीसाठी एक बार कोड प्रदाता म्हणून केंद्रीय डेटाबेस एजन्सीची शक्यता देखील शोधत आहे.

फॉर्म्युलेशनवर सुद्धा बार कोड आवश्यकजूनमध्ये जारी केलेल्या मसुद्याच्या अधिसूचनेत सरकारने म्हटले होते की, फॉर्म्युलेशन उत्पादनांचे उत्पादक आपल्या प्राथमिक पॅकेजिंग लेबल आणि दुय्यम पॅकेज लेबलवर बार कोड किंवा क्विक रिस्पांस कोड प्रिंट किंवा चिकटवतील. यामध्ये सॉफ्टवेअरद्वारे वाचण्यायोग्य डेटा असणार आहे. या डेटामध्ये एक विशिष्ट उत्पादन ओळख कोड, औषधाचे नाव, ब्रँड नाव, निर्मात्याचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख आणि उत्पादन परवाना नंबर असू शकतो. त्यामुळे बनावट औषध बनवणे कठीण होणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम".

टॅग्स :medicinesऔषधंMedicalवैद्यकीय