शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

दालचिनी आहे गुणकारी !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 15:56 IST

दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ फक्त जेवणाचीच चव वाढवत नसून, आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे. रोज थोडी दालचिनी खाल्ल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांचे निवारण होत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

-रवीन्द्र मोरे दालचिनी हा मसाल्याचा पदार्थ फक्त जेवणाचीच चव वाढवत नसून, आपल्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी आहे. रोज थोडी दालचिनी खाल्ल्याने आपल्या आरोग्याच्या अनेक समस्यांचे निवारण होत असल्याचे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. * पचनसंस्थेत सुधारणाबहुतेक जणांना पचनसंस्थेच्या तक्रारी असतात. त्यांनी रोज एक चमचा दालचिनी खाल्ल्यास त्यातील अ‍ॅँटी आॅक्सिडंट्समुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. विशेषत: सकाळी दालचिनी खाल्ल्यास अधिक फायदा होतो. * रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदतबऱ्याचजणांच्या शरीरात रक्त घट्ट होणे किंवा रक्तात गाठी तयार होणे आदी समस्या असतात. अशांनी रोज दालचिनी खाल्ल्यास रक्त पातळ होण्यास मदत होते. यातील नैसर्गिक घटकामुळे रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते. * हृदयरोगाचा धोका टळतो बदलत्या जीवनशैलीचा प्रभाव पडून बहुतेकजण हृदयरोगाने त्रस्त आहेत. दालचिनीत अँटी इन्फ्लेमेटरी गुण असल्याने रोज सेवन केल्यास हे शरीरात खराब कोलोस्ट्रॉल जमा होण्यापासून वाचवतात. यामुळे हृदयरोगाचा धोका टळतो. * ऊर्जेचे स्त्रोतअशक्तपणा किंवा थकवा जाणवल्यास एक चमचा दालचिनी घेऊन ती पाण्यात उकळा. हे पाणी चहाप्रमाणे प्या. यामुळे थकवा दूर होऊन ऊर्जा मिळेल. * श्वसनाच्या विकारांपासून सुटकादालचिनीमध्ये अँटीमायक्रोबिअल गुण असल्याने रोजच्या सेवनाने श्वसनाच्या विकारांपासून सुटका होते. शिवाय दालचिनी संक्रमण तयार करणारी बुरशीदेखील नष्ट करते. * संधिवातापासून आरामआज उतार वयात बहुतांश लोकांना संधिवाताचा त्रास आहे. दालचिनीतील दाहकताविरोधी गुणांमुळे संधिवातापासून आराम मिळण्यास मदत होते. यासाठी दिवसातून एकदा कोमट पाण्यासोबत दालचिनी घ्या. * वजन कमी होण्यास उपयुक्त आज लठ्ठपणाच्या समस्या अनेकांना भेडसावत आहेत. अनेक उपायांपैकी दालचिनीदेखील वजन कमी करण्यास उपयुक्त असल्याचे अनेक संशोधनांतून लक्षात आले आहे.  यासाठी सकाळी एक ग्लास गरम पाण्यासोबत एक चमचा दालचिनी घ्या.