शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलांचं बालपण जपा, नाहीतर ती होतील अकाली ‘प्रौढ’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2017 18:15 IST

लहान वयातच मुलांवर नको त्या जबाबदार्‍या पडल्या तर कोमेजेल बालपण..

 - मयूर पठाडे

 
मुलांचं लहानपण जितकं सुखात, आनंदात आणि पालकांच्या छत्रछायेखाली उबदार वातावरणात जाईल, तितकी ती मुलं भविष्यात जबाबदार नागरिक बनतील, हे एव्हाना सिद्ध झालेलं आहे.
त्यामुळेच ज्यांचं बालपण विपरित परिस्थित किंवा गुन्हेगारी जगताच्या पार्श्वभूमीवर गेलेलं आहे, अशा व्यक्ती त्यांच्या उत्तरायुष्यात गुन्हेगारच बनल्याचं आढळून येतं. 
तुरुंगात असलेल्या अनेक नामचिन गुंडांचा आणि त्यांच्या पुर्वायुष्याचा अभ्यास केल्यावर ते ‘असे’ का झाले याचं उत्तर त्यांच्या बालपणातच सापडतं. या गुन्हेगारांनी स्वत:ही त्याबद्दल ‘परिस्थिती’लाच दोष दिलेला आहे. 
याचा अर्थ गुन्हेगारी वातावरणात वाढलेली प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच बनेल असं नाही, पण गैरमार्गाकडे वळण्याची त्यांची शक्यता खूप जास्त असते.
 
 
त्यामुळेच मुलांचं लहानपण चांगल्या वातावरणात जाणं खूप आवश्यक आहे.
घरची परिस्थिती कशी आहे यावरही मुलं भविष्यात काय बनतील, काय करतील हे बरंचसं अवलंबून असतं.
संशोधकांनी बरीच वर्षे संशोधन करून आता आणखी एक नवीन निष्कर्ष काढला आहे. तुमचं लहानपण जर खूपच गरिबीत आणि हलाखीत गेलं असेल तर त्याचा तुमच्या भविष्यावर तर परिणाम होतोच, पण इतरांपेक्षा तुम्ही वयातही खूप लवकर येता. जबाबदार्‍या लवकर अंगावर पडल्यानं तुमचं बालपण तर कोमेजतच, लहान वयातच तुम्हाला अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात, पण नैसर्गिकरित्याही तुम्ही लवकर वयात येता, तुमच्या वयाच्या इतर मुलामुलींपेक्षा तुम्ही लवकर तारुण्यात येता, हेदेखील शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.
 
 
त्यामुळे पालकांनो, लक्षात ठेवा, आपली परिस्थिती जरी गरिबीची असेल, तरीही लहान वयातच आपल्या मुलामुलींना कामाला जुंपू नका. नको त्या वयात त्यांना न झेपणार्‍या जबाबदार्‍या सोपवल्या तर त्यांचं बालपण नक्कीच कोमेजेल आणि त्यांना अकाली प्रौढत्वही येईल.