शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

सेलेब्रिटी रिपोटर-सोनाली कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:38 IST

दिल चाहता है या बॉलिवुड चित्रपटाच्या गाण्यातून सैफ अली खान या बॉलिवुडच्या तगडया स्टारसोबत अ‍ॅज मराठी गर्ल म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचणारी व त्यामुळे मराठी माणसाची कॉलर ताठ व्हावी अशी परिस्थिती निर्माण करणारी मराठी कलाकार सोनाली कुलकर्णी.  या सुंदर अभिनेत्रीने अनेक बॉलीवुड व मराठी चित्रपट केले आहे. दिल चाहता है, मिशन काश्मीर, सिंघम, वेल डन आब्बा,द कॅम्प, लव खिचडी, श्याडो असे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलीवुडला दिले आहे. व तसेच तितक्याच ताकदीचे डॉ. प्रकाश बाबा आमटे, अंग बाई अरेच्चा २, देऊळ, पुणे ५२, गाभाºयाचा पाऊस, वासुदेव बळवंत फडके, काटा रूते कोणाला असे अनेक मराठी चित्रपट देखील दिले आहे. अशा या मराठमोळी सोनालीला मराठी इंडस्ट्रीबद्दल काय वाटते, तिचा प्रवास,बॉलिवुडचे अनुभव, सध्या मराठी चित्रपटांचा प्रवास याविषयी लोकमत सीएनएक्सने तिच्याशी साधलेला संवाद.

                                     जिसे ढुढॅता हू मै हर कही, जो कभी मिली मुझे है नही                                             मुझे जिसके प्यार पर हो यकीन,                                                     वो लडकी है कहा.......दिल चाहता है या बॉलिवुड चित्रपटाच्या गाण्यातून सैफ अली खान या बॉलिवुडच्या तगडया स्टारसोबत अ‍ॅज मराठी गर्ल म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचणारी व त्यामुळे मराठी माणसाची कॉलर ताठ व्हावी अशी परिस्थिती निर्माण करणारी मराठी कलाकार सोनाली कुलकर्णी.  या सुंदर अभिनेत्रीने अनेक बॉलीवुड व मराठी चित्रपट केले आहे. दिल चाहता है, मिशन काश्मीर, सिंघम, वेल डन आब्बा,द कॅम्प, लव खिचडी, श्याडो असे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलीवुडला दिले आहे. व तसेच तितक्याच ताकदीचे डॉ. प्रकाश बाबा आमटे, अंग बाई अरेच्चा २, देऊळ, पुणे ५२, गाभाºयाचा पाऊस, वासुदेव बळवंत फडके, काटा रूते कोणाला असे अनेक मराठी चित्रपट देखील दिले आहे. अशा या मराठमोळी सोनालीला मराठी इंडस्ट्रीबद्दल काय वाटते, तिचा प्रवास,बॉलिवुडचे अनुभव, सध्या मराठी चित्रपटांचा प्रवास याविषयी लोकमत सीएनएक्सने तिच्याशी साधलेला संवाद.    मराठी व बॉलिवुड या दोन्ही इंडस्ट्रीमध्ये आपले नाव निर्माण करणारी सोनाली कुलकर्णी ही सुंदर अभिनेत्री म्हणते की, मी जरी दोन्ही इंडस्ट्रीत काम केले असले तरी एक कलाकार म्हणून प्रत्येकात एक शिस्त असते. त्याला मिळणाºया चित्रपटाच्या यश- अपयशापेक्षा किवा पुरस्कारा व्यतिरिक्त देखील त्याचे इंडस्ट्रीवर अधिक प्रेम असते. जसे की, प्रत्येकाचे आपल्या परिवारावर अधिक प्रेम असते. जर आपल्या परिवारातआई एखादया वेळेस आपल्यावर रागवली तर तिचे प्रेम काय कमी होत नाही. असेच प्रेम, माया, जिव्हाळा या दोन्ही इंडस्ट्रीबद्दल आहे. या इंडस्ट्री माझ्यासाठी मायबाप आहेत.  जर तुम्ही मराठी इंडस्ट्री काय बदल व्हावा यासाठी विचारात असाल तर, मला स्वत:ला वैयक्तिक असे वाटते की, आता मराठी इंडस्ट्री उंचावर पोहोचत आहे. आता या चित्रपटसृष्ट्रीची प्रगती होत आहे. प्रत्येक मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रगत विचार समाजापर्यत पोहचत आहे. तसेच ओरिनल स्क्रीप, ती रिस्क, चांगले लेखक आता येथे दिसत आहे. त्याचबरोबर संवेदनशील लिखाण देखील पाहावयास मिळत आहे.सातत्याने वेगवेगळे प्रयोगदेखील घडत आहे. त्यामुळे मी खरंच या मराठी इंडस्ट्रीबद्दल खूप समाधानी आहे.      असे म्हणतात की, मराठी चित्रपट हा फक्त मुंबई, पुणे शहरापर्यत पोहचत आहे तो ग्रामीण भागात देखील पोहोचला पाहिजे याविषयी तुझे काय मत, यावर सोनाली म्हणते, सध्या मराठी चित्रपट हा महाराष्ट्राच्या शहरा व्यतिरिक्तदेखील प्रत्येक गा्रमीण भागात गावोगावी पोहोचावा यासाठी प्रत्येक कलाकार, त्या चित्रपटाची टीम व डायरेक्टर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रत्यक्ष त्या गावात जाउन प्रेक्षकांना भेटतात. तसेच तेथील रसिक कलाकारांना देखील आपल्या आवडत्या कलाकाराला भेटण्याची संधी मिळते. या चित्रपटाच्या  प्रमोशन माध्यमातून कलाकार प्रयत्नशील असले तरी ग्रामीण भागातील थिएटरची संख्या वाढविणे देखील तितकेच आवश्यक आहे.    मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्याची संख्या जास्त आहे. एकाच दिवशी पाच पाच चित्रपट प्रदर्शित होतात याचा फटका इतर चित्रपटांनादेखील बसतो का?  येस अपकोर्स हा मराठी इंडस्ट्रीला सर्वात जास्त व मोठा फटका बसतो. यासाठी  सर्व दिग्दर्शकाने एकमेकांत संवाद व चर्चा करणे आवश्यक आहे. तसेच  ही जबाबदारी फक्त चित्रपट महामंडळाची नसून मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांची देखील आहे. आणि मराठी चित्रपटाला अजून उंचावर पोहोचविण्यासाठी एक विशिष्ट  प्रकारची रेग्युलेशन करणे देखील  आवश्यक आहे. तसेच डायरेकक्टर, प्रोड्युसर व थिएटर मालक या सर्वानी एकत्रित चर्चा करणे महत्वाचे आहे. बॉलिवुडमध्ये जर तगडे कास्ट चित्रपटाला फटका बसू नये म्हणून  चित्रपट रिलीजची डेट पुढे ढकलू शकतात तर, मराठी कलाकार का नाही? हा बदल जर झालाच तर त्याचा फायदा मराठी इंडस्ट्रीला नक्कीच होईल.       मराठी चित्रपटाचा प्रेक्षकवर्ग म्हणाल तर, तो सामाजिक व मनोरंजनात्मक पाहणाºयांची संख्या देखील तितकीच आहे. कारण मराठी प्रेक्षक हा संपन्न रसिकेतून जन्मला आहे. तो प्रत्येक गोष्टीला भरूभरून प्रतिसाद देत असतो. तो नेहमी नावीन्यांची वाट पाहत असतो. ज्या कलाकाराला मराठी प्रेक्षक लाभला आहे. तो खरंच खूप लकी म्हणावं लागेल.    अशा प्रकारे या मराठमोळी अभिनेत्रीचे विचार, मराठी चित्रपटांविषयीचा जिव्हाळा, तिचे दोन्ही इंडस्ट्रीविषयी असणारे प्रेम पाहता,सैफ अली खानला एवढेच म्हणावे वाटते की, ही मराठमोळी लडकी है यहा!