शहरं
Join us  
Trending Stories
1
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
2
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
3
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
4
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
5
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
6
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
7
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
8
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
9
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
10
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
11
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
12
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
13
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
14
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
15
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
16
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
17
नागपूर: 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड; पुण्यातील व्यक्तीच्या घरावर घेतलं कर्ज, ५ कोटींचा गंडा
18
Ganesh Chaturthi 2025: मराठी कलाकारांच्या घरी झाले बाप्पाचे आगमन, पाहा फोटो
19
जैशला पुनरुज्जीवित करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न; मसूदच्या दहशतवाद्यांसाठी काय करतंय पाक सरकार?
20
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल

सेलिब्रेटीची सामाजिक संदेशाची होळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 14:16 IST

 मराठी तारकांनी लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून तरूणांना राज्यातील दुष्काळ परिस्थितीची जाणीव करून सामाजिक संदेशाची होळी साजरी केली आहे.

बॉलीवुडमध्ये होळी हा सण म्हणजे एक मोठा उत्साहच असतो. सर्व बॉलीवुड सेलिब्रेटी पूर्णपणे व्हाईट कलरचे कपडे परिधान करून एकदम झक्कास स्टाईलने होळीचा आनंद लुटतात. पूर्वी राज कपूर यांच्यावेळेस आरके स्टुडिओमध्ये साजरी होणारी होळी ही बॉलीवुड इंडस्ट्रीसहित तमाम प्रेक्षकवर्गाला आकर्षित करणारी होती. त्याहीपलीकडे जाउन मराठी इंडस्ट्रीमध्ये होळी सेलिब्रेट करण्याची पद्धत तितकी रूढ नाही दिसत. यंदा ही मराठी सेलिब्रेटीमध्ये होळी साजरी करण्याची क्रेझ दिसत नाही. याउलट जाउन मराठी तारकांनी लोकमत सीएनएक्सच्या माध्यमातून तरूणांना राज्यातील दुष्काळ परिस्थितीची जाणीव करून सामाजिक संदेशाची होळी साजरी केली आहे. तेजस्विनी पंडीत: गुलाबाची कळी या गाण्यातून तरूणांच्या मनावर राज्य करणारी तेजस्विनी पंडीत म्हणते,लहानपणापासून शिकविले जाते की, पर्यावरणाचा ºहास करू नये. ही आपली नैसर्गिक साधन संपत्ती आहे. पण ऐन होळीच्या दिवशी या शिकवणीचा विसर सर्वानाच पडलेला दिसतो. कारण या दिवशी झाडे तोडून त्याची होळी करतात.यावर उपाय म्हणून सुकलेला पालापाचोळयाचा उपयोग करावा. तसेच यादिवशी सुकी होळी खेळा असे म्हटले तरी, तोंड धुवायला पाणी वापराव लागतंच ना हा ही विचार दुष्काळस्थितीत करणे तितकेच आवश्यक आहे. त्यापेक्षा होळी दिवशी स्वत:च्या स्वभावातील वाईट गुणांचा त्याग करून आयुष्यात नवीन रंग भरण्याचा प्रयत्न करावा.प्रार्थना बेहरे: मितवा, कॉफी आणि बरचं काही यांसारखे हिट चित्रपट देणारी प्रार्थना बेहरे म्हणते, होळी हा सण प्रॅक्टीकली साजरा करते. सध्या महाराष्ट्रात दुष्काळ परिस्थिती चालू आहे.तसेच शहरात ही पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे या गोष्टीचे भान ठेवून नागरिकांनी पाण्याचा न करता होळी साजरी करावी.तसेच एक होळीचा अनुभव देखील लोकमत सीएनएक्सशी शेअर करते, काही वर्षापूर्वी होळीच्या दिवशी आॅडिशनला निघाले होते. त्यावेळी काही मुलांनी माझ्या अंगावर घाणेरडया पाण्याने भरलेले फुगे फेकले होते. त्यावेळी खूप मानसिक त्रास झाला. त्यामुळे विशेषत: लहान व तरूण मुलांना सांगते की, फुगे फेकून पाण्याचा मार देवू नये. तसेच कोणाला जखम होणार नाही याची देखील काळजी घ्यावी.सोनाली कुलकर्णी: अप्सरा आली या गाण्यातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव चुकविणारी सोनाली कुलकर्णी सांगते, मी स्वत: होळी खेळत नाही. कारण मला कलरची फार भिती वाटते. पण तरूणांनो सामाजिक भान म्हणून दुष्काळ परिस्थिती असताना पाण्याचा जास्त वापर होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच चांगल्या क्वॉलिटीचे ड्राय कलर वापरा. कलर लावताना समोरील व्यक्तीच्या डोळ््यात जाणार नाही याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. प्रिया बापट: टाइमपास, टाइमप्लीज यांसारख्या  चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी प्रिया बापट म्हणते, आजच्या धावपळीच्या युगात सण साजरे करणे ही गरज बनली आहे. कारण सणाच्या निमित्ताने तरी सर्व लोक एकत्रित येऊन सणाचा आनंद लुटतात. आमची होळी म्हणजे एकत्रित येऊन पुरण-पोळयांच्या जेवणाचा आस्वाद लुटणे हा असतो. तसेच एक नागरिक म्हणून सामाजिक जबाबदारी पाळणे आवश्यक आहे. कारण सध्या दुष्काळ परिस्थीती असल्यामुळे पाणी बचत करणे हा देखील देश संवर्धन करण्याचा एक भाग आहे. पूजा सावंत: दगडी चाळ, पोस्टर बॉयज या चित्रपटातून तरूणांची धडकन बनलेली पूजा सावंत म्हणते, मी स्व:त इकोफ्रेंडली होळी साजरी करते. जास्त कलर व पाण्याचा वापर न करता फक्त कपाळाला साधा एक टिक्का लावून या सणाचा आनंद लुटते. तसेच आपला महाराष्ट्र हा कधी दुष्काळी नव्हता, पण आज जी दुष्काळाची परिस्थीती निर्माण झाली आहे. याला आटोक्यात आणण्यासाठी तरूणांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी तरूणांनी पाण्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे.             मराठी इंडस्ट्रीच्या या सुंदर अभिनेत्रींनी होळीनिमित्त दिलेला सामाजिक संदेश हा प्रत्येकाने अंमलात आणणे गरजेचे आहे.तसेच या धावत्या युगात प्रत्येकाने एकत्रित येऊन प्रत्येक सण हा उत्साहाने साजरा करणे आवश्यक आहे. होळी या सणानिमित्त सर्वाना लोकमत सीएनएक्सच्यावतीने होळीच्या हार्दिक शुभेच्छा.