शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रोखीने व्यवहार करणारी हॉस्पिटल्स आयकरच्या रडारवर; पॅन नंबरची नोंदही नाही, करचुकवेगिरीचा प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 06:19 IST

विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते रुग्णाला उपचारासाठी दाखल करून घेताना शक्य झाले नाही तरी उपचार सुरू झाल्यानंतर पॅन क्रमांक नोंदविणे शक्य आहे.

मुंबई :

राज्यातील अनेक शहरांमधील रुग्णालयांतून रोखीने व्यवहार होत असल्याची माहिती आयकर विभागाला प्राप्त झाली असून, आता विभागाने या रुग्णालयांचे व्यवहार तपासण्याचे नियोजन केले आहे. रोखीने व्यवहार करताना संबंधित रुग्णाचा किंवा पैसे भरणाऱ्याचा पॅन क्रमांक नोंदविला जात नसल्याचीही माहिती विभागाला मिळाली असून, त्या अनुषंगानेच कर चुकवेगिरीच्या मुद्द्यावर आता विभागाने कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत राज्यातील द्वितीय, तृतीय श्रेणी शहरे, नागरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोखीने व्यवहार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर विभागाने तेथे छापेमारी करत कोट्यवधींची रोख रक्कम जप्त केली. या रकमेची कोणतीही व्यावहारिक नोंद या छाप्यादरम्यान विभागाला सापडली नाही. रोखीने झालेल्या या व्यवहारांमुळे कर चुकवला गेला असून, महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळेच आता या शहरांतील अन्य घटकांकडे विभागाने आपला मोर्चा वळवला आहे.  पार्टी हॉल आणि व्यावसायिकांकडे लक्षनागरी भागात अनेक ठिकाणी पार्टी हॉल, पार्टी लॉन्स आहेत. इथे होणाऱ्या समारंभांसाठी होणारे व्यवहारही रोखीने होत असल्याची माहिती विभागाकडे आहे. त्यामुळे त्यांच्याकडेही लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. याखेरीज, वास्तूविशारद, डॉक्टर, वकील यांचेही व्यवहार तपासण्याची तयारी विभागाने सुरू केली आहे.

लाखो रुपयांचे व्यवहार- मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर अशा प्रमुख शहरांमध्ये विभागाची कार्यालये आहेत. जिल्हानिहाय देखील विभागाची कार्यालये आहेत. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रत्येक शहरातील व्यवहार तपासणे शक्य होत नाही. - मात्र, लहान शहरांतून मिळालेल्या कोट्यवधी रुपयांच्या बेहिशोबी रकमेमुळे आता तिथे लक्ष केंद्रीत करण्यात येत असल्याचे विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले. - रोखीने व्यवहार होतात, तिथे संबंधितांचा पॅन क्रमांक नोंदवणे बंधनकारक आहे. मात्र, रुग्ण आपत्कालीन प्रसंगात येतात, उपचाराला प्राधान्य द्यावे लागल्याने पॅनकार्ड नोंदविणे शक्य होतेच असे नाही, असे रुग्णालयांचे सांगतात. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल