शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

CoronaVirus News: कोरोना होऊ नये म्हणून रोज प्यायचा ५ लीटर पाणी अन् मग घडलं असं काही...

By कुणाल गवाणकर | Updated: December 30, 2020 15:08 IST

CoronaVirus News: कोरोनाची लागण होऊ नये यासाठी दररोज ५ लीटर पाणी प्यायचा सरकारी कर्मचारी

ब्रिस्टल: कोणत्याही सजीव व्यक्तीला जिवंत राहण्यासाठी पाणी अत्यंत गरजेचं असतं. त्यामुळेच पाण्याला जीवन असं म्हणतात. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच असतो. त्याचा प्रत्यय ब्रिटनच्या ब्रिस्टलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला आला आहे. जास्त पाणी प्यायल्यानं एका व्यक्तीची प्रकृती बिघडली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.कोरोनाचा नवा स्ट्रेन हातपाय पसरतोय; २० भारतीयांमध्ये लक्षणं दिसल्यानं चिंतेत भर३४ वर्षांचे ल्यूक विल्यमसन ब्रिस्टलमध्ये कुटुंबासह राहतात. ते सरकारी कर्मचारी आहेत. ब्रिटनमध्ये पहिला लॉकडाऊन सुरू होता, त्यावेळी ल्यूक यांना स्वत:ला कोरोना झाल्याचा संशय आला. दररोज दुप्पट पाणी प्यायल्यास कोरोनावर मात करू, असा विचार त्यांनी केला. सर्वसामान्यपणे माणूस दिवसाला १ ते २ लीटर पाणी पिऊ शकतो. डॉक्टरांकडूनदेखील इतक्या प्रमाणातच पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. भय इथले संपत नाही! 2 वर्षांच्या चिमुकलीमध्ये आढळला कोरोनाचा नवा स्ट्रेनल्यूक दिवसाला ४ ते ५ लीटर पाणी पिऊ लागले. त्यामुळे त्यांच्या शरीरातलं सोडियमचं प्रमाण कमी होऊ लागलं. सातत्यानं पाणी पित असल्यानं सोडियमचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी झालं. त्यामुळे एके दिवशी ल्यूक भोवळ येऊन पडले. 'ल्यूक अंघोळीसाठी गेले असताना त्यांना भोवळ आली. ते बाथरूममध्ये कोसळले. लॉकडाऊन असल्यानं मला शेजारच्यांची मदत मिळाली नाही. रुग्णवाहिका येण्यासाठी ४५ मिनिटं लागली. रुग्णवाहिका येण्याच्या २० मिनिटांपर्यंत ल्यूक बेशुद्ध होते,' अशी माहिती त्यांच्या पत्नीनं दिली.काही दिवसांपासून जास्त पाणी पित असल्यानं ही परिस्थिती ओढावल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. 'अतिशय जास्त पाणी प्यायल्यानं शरीरातील मिठाचं प्रमाण अत्यंत कमी झालं. त्यामुळे ल्यूक यांची प्रकृती बिघडली. त्यांना दोन-तीन दिवस आयसीयूत ठेवण्यात आलं. ते व्हेंटिलेटरवर होते. रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केल्यानं ल्यूक यांची प्रकृती सुधारली,' असं ल्यूक यांच्या पत्नीनं सांगितलं.