शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हजार रुपयांत स्तनाचा कर्करोग बरा... टाटा मेमोरिअल रुग्णालयाकडून उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 08:13 IST

दरवर्षी सुमारे चार हजार कर्करुग्णांचा जीव वाचविणे शक्य होईल.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्तनांचा कर्करोग बरा करण्यासाठी टाटा मेमोरिअल रुग्णालयाने अवघ्या हजार रुपयांत औषधोपचार उपलब्ध केले आहेत. अहवालाअंती योग आणि व्यायाम केल्याने स्तनांच्या कर्करुग्णांत मृत्युदर १५ टक्क्यांनी घटल्याचे आशादायी निरीक्षण समोर आले आहे. यामुळे दरवर्षी सुमारे चार हजार कर्करुग्णांचा जीव वाचविणे शक्य होईल.

ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर या अत्यंत गंभीर प्रकारच्या स्तन कर्करोग असणाऱ्या रुग्णांमध्ये विशेषतः ५० वर्षांपेक्षा कमी असणाऱ्या महिलांमध्ये कार्बोप्लॅटिन औषधाने कर्करोग बरा होण्याचे प्रमाण वाढले आहे. यापूर्वी, सर्व प्रकारच्या कर्करोग उपचारांत वापरात येणाऱ्या या औषधाविषयी एवढा महत्त्वाचा निर्णायक पुरावा उपलब्ध नव्हता.

परंतु, टाटा रुग्णालयात २०१० ते २०२२ या काळात नोंदणी केलेल्यांपैकी ८५० रुग्णांचा या अभ्यासात सहभाग होता. त्याचप्रमाणे, या रुग्णांनी सातत्याने दोन वर्षे योग आणि व्यायाम केल्यामुळे शारीरिक-मानसिक आरोग्य सुदृढ होण्यास मदत झाल्याची सकारात्मक बाब दिसल्याची माहिती रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी दिली आहे.टाटा मेमोरिअल रुग्णालयातील या संशोधनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. अमेरिका येथे आयोजित सॅन अँटेनियो ब्रेस्ट कॅन्सर सिम्पोजियम या परिषदेत टाटा रुग्णालयाच्या डॉ. नीता नायर यांनी हे संशोधन सादर केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. 

अहवालातील वैशिष्ट्ये स्तनांचा कर्करोग असलेल्यांवर उपचारांबरोबरच योग आणि व्यायामामुळे आयुर्मान ६६ वरून ७४ टक्क्यांवर गेले.  शारीरिक हालचालींना गती मिळते. भावनिक, मानसिक बुद्ध्यांकात सकारात्मक बदल. केमोथेरपीच्या तुलनेत दुष्परिणाम कमी. वेदनांचे प्रमाणही कमी, रोग प्रतिकारकशक्तीत सुधारणा.

कार्बोप्लेटिनम इंजेक्शनविषयी  सर्व प्रकारच्या कर्करोगांत या इंजेक्शनचा वापर,  स्तनांचा कर्करोग बरा करण्यात महत्त्वाचे योगदान. विविध औषध कंपन्यांमार्फत सहज जगभरात उपलब्धता. एकूण सहा महिन्यांचा उपचार कालावधी. प्रजनन प्रक्रियेवर परिणाम नाही.

टॅग्स :Tataटाटा