शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

​मेंदूचे स्कॅन सांगणार तुमच्या ‘वेट लॉस’चे भविष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2016 17:39 IST

‘वेक फॉरेस्ट बाप्टिस्ट मेडिकल सेंटर’च्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅन करून वजन घटविण्यात कोण यशस्वी ठरेल हे सांगणारी जलद स्कॅनिंग पद्धत शोधून काढली आहे.

वजन घटवण्यासाठी आपण काय काय नाही करत? सर्व उपाय आणि पथ्ये पाळूनही मनासारखा परिणाम दिसून येत नाही. यावर उपाय म्हणून संशोधकांच्या गटाने मेंदू स्कॅन करण्याची एक अशी आधुनिक पद्धत विकसित केली आहे जी वृद्ध व्यक्तीमध्ये वजन कमी होण्याची किती शक्यता आहे याबद्दल अंदाज वर्तवू शकते.‘वेक फॉरेस्ट बाप्टिस्ट मेडिकल सेंटर’च्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅन करून वजन घटविण्यात कोण यशस्वी ठरेल हे सांगणारी जलद स्कॅनिंग पद्धत शोधून काढली आहे.स्ट्रक्चरल ब्रेन कॅरेक्टरिस्टक्सचा वापर करून अशा प्रकारच्या स्कॅनिंगद्वारे एखादी व्यक्ती वजन कमी करण्यात किती यशस्वी ठरेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. या माहितीवरून मग आपण त्या व्यक्तीसाठी वैयक्तिक उपचार प्रणाली तयार करू शकतो, अशी माहिती प्रा. जॉनथन बर्डेट यांनी दिली.उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्ती वजन कमी करण्यात अयशस्वी होणार असेल तर त्यासाठी स्पेशल काळजी घेतली जाऊ शकते. या अध्ययनात ६० ते ७९ वयोगटातील ५२ लोकांनी सहभाग घेतला होता. त्यांचा बीएमआय २८ ते ४२ दरम्यान होता तर त्यांना हृदयविकार आणि मेटाबोलिक सिन्ड्रोमचाही त्रास होता.                                  सहभागी झालेल्या लोकांचा बेसलाईन एमआरआय स्कॅन केला गेला आणि  मग ‘डाएट’, ‘डाएट व अ‍ॅरोबिक व्यायाम’ आणि ‘डाएट व रिझिस्टन्स एक्ससाईज प्रशिक्षण’ अशा तीन गटांत विभागण्यात आले. सुमारे दीड वर्षांच्या या डाएट व व्यायाम प्रकल्पाचा उद्देश ७ ते १० टक्के बॉडी मास कमी करण्याचा होता.दीड वर्षांनी त्यांचे पुन्हा एमआरआय स्कॅन करून त्याची आधीच्या स्कॅनिंगशी तुलना करण्यात आली. मेंदूच्या ग्रे आणि पांढरे मॅटरवरून मग वजन कमी करण्यात किती प्रमाणात यश मिळेल याचा अंदाज वर्तवला जातो.