शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Bird Flu : धोक्याची घंटा! बर्ड फ्लू पुन्हा घालणार थैमान?; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 14:19 IST

Bird Flu : बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे.

बर्ड फ्लूबाबत तज्ज्ञांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. अलीकडेच अमेरिकेतील टेक्सासमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर ही धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे. अंटार्क्टिकमधील पेंग्विनमध्ये बर्ड फ्लू आढळल्यानंतर, मानवामध्ये H5N1 व्हायरसची पुष्टी झाल्याबद्दल अलर्ट जारी करण्यात आला आहे. आरोग्य तज्ञांचे असे मत आहे की, याकडे गांभीर्याने आणि सावधगिरीने पाहिले पाहिजे कारण ते महामारीचे रूप धारण करू शकते आणि मोठ्या प्रमाणावर विनाश घडवू शकते. बर्ड फ्लू H5N1 इतका धोकादायक का मानला जातो ते जाणून घेऊया. बर्ड फ्लूवर संशोधन करणाऱ्या संशोधकांनी एवियन फ्लू म्हणजेच बर्ड फ्लूबाबत इशारा दिला आहे. हा व्हायरस अनेक वर्षांपासून साथीच्या यादीत अग्रस्थानी आहे. आता तो धोकादायक बनत चालला आहे. असे झाल्यास धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते असं म्हटलं आहे. तसेच जॉन फुल्टन नावाच्या तज्ज्ञाने असं म्हटलं आहे की, तो कोरोनापेक्षा 100 पट जास्त धोकादायक होऊ शकतो. म्यूटेट होऊ शकतो आणि घातक ठरू शकतो. बर्ड फ्लूची प्रकरणं फक्त टेक्सासमध्येच नाही तर अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये आढळून आली आहेत. हा व्हायरस गायींमध्येही पसरला आहे. अमेरिकेत मानवांमध्ये एव्हीयन फ्लूची ही दुसरी घटना आहे. कोलोरॅडोमध्ये 2022 मध्ये पहिली केस आढळली होती. 1 जानेवारी 2003 ते 26 फेब्रुवारी 2024 पर्यंत जगातील 23 देशांमध्ये मानवांमध्ये बर्ड फ्लूचे 887 रुग्ण आढळले आहेत. डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, यापैकी 462 प्रकरणे अतिशय धोकादायक आहेत. बर्ड फ्लूचा व्हायरस पहिल्यांदा 1959 मध्ये समोर आला होता. 2020 नंतर, तो अनेक देशांमध्ये प्राण्यांमध्ये पसरला आहे. बर्ड फ्लूची लक्षणं

- इतर कोणत्याही फ्लूप्रमाणे बर्ड फ्लूची लक्षणे आहेत.- खोकला येणे. - ताप येणे.- अंगदुखी- गंभीर किंवा जीवघेणा न्यूमोनिया होण्याचा धोका.

 आरोग्यासंबंधीत कोणतीही समस्या असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.  

टॅग्स :Bird Fluबर्ड फ्लू