भार्गवी आणि मानसीचा हटके लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2016 13:55 IST
भार्गवी चिरमुले आणि मानसी नाईक यांचा ग्लॅमर लूक पाहून नक्कीच भारी वाटेल यात शंका नाही.
भार्गवी आणि मानसीचा हटके लूक
भार्गवी चिरमुले आणि मानसी नाईक यांचा ग्लॅमर लूक पाहून नक्कीच भारी वाटेल यात शंका नाही.आपल्या नृत्याने रसिकांच्या मनावर ठसा उमटविणाºया या दोन सुंदर अभिनेत्रींनी कविता व श्रद्धा ओझा यांनी डिझायन केलेल्या इंडियन वेअर व वेस्टन वेअर या आउटफिटमध्ये रॅम्प वॉक करून प्रेक्षकांची मने जिंकली. तसेच भार्गवीने परिधान केलेला रेड कलरचा प्लेन घागरा,रेड ब्लाउज व रेड दुपट्टा आणि त्याचबरोबर चढविलेल्या दागिन्यांमुळे तिचे सौदर्य अधिक खुलून दिसत होते. तर मानसी पिंक वाईट कॉम्बिनेशचा फुल गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसत होती. त्यांचे हे सौदर्य म्हणजे जणू काही नववधूच. रॅम्प वॉकचा हा अनुभव लोकमत सीएनएक्सशी शेअर करताना भार्गवी म्हणाली, माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा रॅम्प वॉक केला आहे. त्यामुळे खूप मजा आली. या रॅम्प वॉकमध्ये मी इंडियन वेअरची शो स्टॉपर होते तर मानसी वेस्टन वेअरची शो स्टॉपर होती. खरंच हा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. असो, पण मराठी अभिनेत्रींचे हे गॅल्मरस लूक पाहता, भविष्यात बॉलीवुड अभिनेत्रींना ही टक्कर देतील हे नक्की.