शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
3
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
4
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
5
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
6
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
7
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
8
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
9
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
10
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
11
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
12
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
13
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
14
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
15
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
16
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
17
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
18
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
19
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले

सावधान! कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतरही ९० दिवसांपर्यंत संसर्ग पसरवू शकतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 10:44 IST

COVID19 Patients May Spread Virus For Upto 90 Days After Recovery : कोविड-१९ च्या आजारातून रिकव्हर झालेल्या अतिगंभीर रुग्णांच्या शरीरात जवळपास ९० दिवस SARS CoV-2 व्हायरस असतो, असे दिसून आले आहे.

जगभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत जगभरात अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांचा आकडा सुद्धा मोठा आहे. यातच अमेरिकेतील विविध रुग्णांलयातील डेटाच्या विश्लेषणानुसार, कोविड-१९ च्या आजारातून रिकव्हर झालेल्या अतिगंभीर रुग्णांच्या शरीरात जवळपास ९० दिवस SARS CoV-2 व्हायरस असतो, असे दिसून आले आहे.

या विश्लेषणामुळे अशी भीती व्यक्त होत आहे की, अशा रुग्णांमध्ये व्हायरस प्रसार करण्याची क्षमता जास्त असते. यामुळे भारतात ६४ लाखांहून अधिक लोक संक्रमित झाले आहेत, तर १ लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. सौम्य आणि मध्यम रुग्णांमध्ये फक्त १० दिवस संसर्ग असतो. तसेच, ज्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते. मात्र, मध्यम स्वरुपात आजारी असतात ते २० दिवस संसर्गजन्य असतात.

'कोविड- १९' रुग्णांमध्ये जे गंभीररित्या आजारी आहेत. ते ९० दिवस संक्रमित असतात, असे अमेरिकेतील अटलांटा येथील रोग नियंत्रण व प्रतिबंध केंद्राच्या आकडेवारीत आढळले आहे. अमेरिकेतील एजन्सीच्या विश्लेषणानुसार, कोरोनापासून रिकव्हर झालेले लोक १५ मिनिटांत दुसऱ्याला व्यक्तीपर्यंत संसर्ग पसरवू शकतात. तसेच, जर कोणताही आजार अशा रुग्णांना ९० दिवसांनंतर झाला, तर तो कोरोना नव्हे, असेही यामध्ये म्हटले आहे. 

आयसोलेशन प्रक्रिया महत्त्वाची आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये RT-PCR पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. मात्र, त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती असल्याचे दिसून आले. या कॅटगरीमधील रुग्णांची तपासणी दर आठवड्याला केली जात आहे. अँटिबॉडीच्या पातळीनुसार,  त्यांना पुन्हा ड्युटीवर घेण्याबाबत ठरविले जाते, असे केअर हॉस्पिटलचे रोगतज्ज्ञ डॉ. मुस्तुफा अफझल यांनी सांगितले.

जगाच्या तुलनेत भारतात रुग्ण, मृतांची संख्या कमीजागतिक पातळीच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना रुग्ण तसेच या आजाराला बळी पडलेल्यांचे प्रमाण (केस फॅटिलिटी रेट - सीएफआर) कमी आहे. गेल्या पाच महिन्यांत भारतातील सीएफआर पहिल्यांदाच २.५ टक्क्यांपेक्षा कमी झाला. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जागतिक स्तरावरील सीएफआर १८ जुलै रोजी ३.४१ टक्के होता. देशात १२ मार्च रोजी कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यावेळेपासून मे महिन्याच्या मध्याला ३.२३ टक्के इतका सर्वात जास्त सीएफआर नोंदविला गेला. त्यानंतर भारताचा सीएफआर दर हा २.८ टक्क्यांच्या आसपासच होता. देशात कोरोना रुग्ण शोधण्यासाठी वेगाने सुरू केलेल्या हालचाली, चाचण्यांची वाढविलेली संख्या व उपचारविषयक सोयीसुविधा वेळीच उपलब्ध करून दिल्याने सीएफआरचे प्रमाण कमी झाले. देशातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे प्रमाण कमी राखण्यात यश आले असून सध्या २.४९ टक्के इतका सीएफआर आहे. जगातील सर्वात कमी सीएफआर भारताचा आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या