शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

BEAUTY : ​घरगुती उपायांनी घालवा दाताचा पिवळेपणा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2017 14:39 IST

दातांच्या पिवळेपणामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य काही अंशी प्रभावित होऊन आपला आत्मविश्वास कमी होतो.

-Ravindra Moreबऱ्याचजणांना तंबाखू, गुटखा, मद्यपान करण्याची सवय असते. यामुळे तर दात पिवळे पडतात शिवाय खूप औषधे घेतल्याने आणि स्वच्छता न राखल्याने दातांवर पिवळे डाग पडतात. शिवाय योग्य माहिती नसल्यामुळे दात स्वच्छ करण्यासाठी विविध प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. याचा देखील दातांवर वाईट परिणाम होतो. या सर्व कारणांमुळे दातांचा पिवळेपणा ही सध्या फार मोठी समस्या बनली आहे. दातांच्या पिवळेपणामुळे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य काही अंशी प्रभावित होऊन आपला आत्मविश्वास कमी होतो. आजच्या सदरात आम्ही तुम्हाला दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय सांगणार आहोत. * कडुलिंबाची काडीकडुलिंबाची काडी ही नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल व अँटीसेप्टीक आहे. शिवाय कडुलिंबात दात स्वच्छ करण्याचे व बॅक्टेरिया नष्ट करण्याचे गुण आहेत. त्यामुळेच कडुलिंबाच्या काड्या पूर्वीपासून दात साफ करण्यासाठी वापरल्या जात आहेत. रोज लिंबाच्या काडीने दात साफ केल्याने दातांना कीड लागत नाही.* स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारे मॅलिक अ‍ॅसिड दातांना पांढरे व चमकदार बनवते. दातांचा पिवळेपणा घालवून दातांना चमकदार बनवण्याचा स्ट्रॉबेरी हा एकदम चविष्ट उपाय आहे.  सर्वप्रथम स्ट्रॉबेरी वाटून घ्या. या पल्पमध्ये थोडा बेकिंग सोडा मिसळा. ब्रश केल्यानंतर हे मिश्रण बोटांनी दातांवर लावा. काही दिवस नियमितपणे हा उपाय केल्यावर दात चमकायला लागतील. * मीठ  मीठाने दात स्वच्छ करणे हा फार जुना उपाय आहे. मीठात २-३ थेंब मोहरीचे तेल मिसळून दात साफ केल्याने पिवळेपणा दूर होऊन दात चमकायला लागतील.