शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! तरुण वयात वाढतोय ब्रेन स्ट्रोक; वेळीच उपचार न मिळाल्यास जीव जाऊ शकताे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 06:59 IST

मे महिना हा जागतिक पक्षाघात जागरूकता महिना (स्ट्रोक) म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने तरुणांमध्ये वाढणाऱ्या या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे

मुंबई : उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार, स्थूलता, धूम्रपान, मद्यपानाचे व्यसन असलेल्यांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक आहे. याशिवाय बदलती जीवनशैली आणि ताणतणाव यामुळेही तरुण वयात हा आजार होण्याचे प्रमाण प्रचंड वाढताना दिसत आहे. पक्षाघाताचा झटका आल्यानंतर रुग्णाला गोल्डन अवर म्हणजेच पाच तासांच्या आत उपचार मिळणे गरजेचे असते. वेळीच उपचार न मिळाल्यास जीव जाऊ शकताे.

मे महिना हा जागतिक पक्षाघात जागरूकता महिना (स्ट्रोक) म्हणून ओळखला जातो. या निमित्ताने तरुणांमध्ये वाढणाऱ्या या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज आहे. सध्या पक्षाघाताचे अनेक रुग्ण आहेत, जे दैनंदिन कामे करण्यासाठी इतरांवर अवलंबून असतात. म्हणून पक्षाघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी वेळीच लक्ष देऊन उपाय घेणे गरजेचे आहे. बऱ्याच स्ट्रोकच्या रुग्णांना पहिल्या काही महिन्यांत नैराश्य येते. त्या काळात समुपदेशकाची मदत घ्यायला हवी, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले.

१५% तरुणांना स्ट्रोकचा झटकाब्रेन हॅमरेज हा ब्रेन स्ट्रोकचाच एक प्रकार आहे. जेव्हा मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या रक्ताचा पुरवठा कमी करू लागतात, तेव्हा ब्रेन स्ट्रोकचा झटका येतो. जेव्हा या रक्तवाहिन्या ब्लॉक होतात तेव्हा याला एस्केमिक स्ट्रोक असे म्हणतात.

वेळीच उपचार घेणे गरजेचेब्रेन स्ट्रोक किंवा ब्रेन हॅमरेजचा धोका आता ज्येष्ठ नागरिकांपुरता मर्यादित राहिला नसून तरुणांमध्येही या आजाराचा धोका वाढताना दिसून येत आहे. जगभरात या आजाराने अनेक तरुणांना जीव गमवावा लागत आहे. पक्षाघातावर वेळीच उपचार झाल्यास रुग्ण बरा होऊ शकतो आणि मृत्यूचा धोकाही टाळता येतो. - डॉ. विश्वनाथन अय्यर, न्यूरोसर्जन

धोका कोणाला?

तरुणपिढीत ज्यांना रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या आहे, त्यांना हा त्रास होऊ शकतो. हृदयात जन्मतः छेद असल्यास जन्मानंतर काहीच महिन्यात ते बंद करण्यात आले नसेल तर अशांना ब्रेन स्ट्रोकचा धोका अधिक असतो. ज्यांच्या रक्तवाहिन्या कमकुवत आहेत त्यांनाही हा धोका संभवतो.तीव्र डोकेदुखी, मायग्रेनने त्रस्त असणाऱ्यांनाही ब्रेन स्ट्रोकचा धोका असतो. १५% एका सर्वेक्षणानुसार देशात तरुणांमध्ये एस्केमिक स्ट्रोक हा आजार असल्याचे आढळून येत आहे.