शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

पाठदुखी? छे! आता होईलच कशी?

By admin | Updated: May 11, 2017 17:40 IST

घरच्या घरी करण्याचे आठ उपाय. आणि पाठदुखीला कारा कायमचं हद्दपार.

 - मयूर पठाडे

 
जगातली अशी एकही व्यक्ती नसेल जिची पाठ कधीच दुखली नसेल. महिलांपासून ते पुरुषांपर्यंत; आजकाल तर लहान मुलं आणि तरुणाईतही पाठदुखीची लागण सुरू झाली आहे.
अनेक जण त्यावर बरेच उपचार घेतात, औषधोपचार करतात, पैसे खर्च करतात. तुम्हीच बघा, आजवर या पाठदुखीनं तुम्हाला किती हैराण केलंय आणि आपल्या खिशाला किती ‘चंदन’ लावलंय ते.
पण खरं तर ही पाठदुखी आपण आपल्याच करणीनं ओढवून घेतलेली असते. साधे सोपे उपाय आहेत, ते जर तुम्ही नियमितपणे केलेत, तर तुम्हाला ना कधी डॉक्टरांची गरज लागेल, ना कधी पाठदुखी होईल. 
 
कशी कराल पाठदुखीची छुट्टी?
 
 
1- व्यायाम
कोणता व्यायाम कराल? अगोदर व्यायाम तर सुरू करा. त्यानं आपोआप फरक पडेल. त्यानंतर मग तज्ञांच्या सल्ल्यानं पाठदुखीवरचे किंवां पाठ दुखू नयेत म्हणून व्यायाम सुरू केलात तर पाठदुखी कायमची दूर पळू शकेल. संशोधनांन सिद्ध झालेलं आहे की आपल्या मसल्सला कायम हालचालींची गरज असते. व्यायामामुळे मसल्सची हालचाल वाढली की पाठदुखीही हळूहळू कमी होऊ शकते. याशिवाय जे अनफिट आहेत, त्यांच्यात पाठदुखी लवकर जोर धरू शकते हेदेखील संशोधनानं सिद्ध झालं आहे. 
 
2- अरबटचरबट खाणं टाळा
आपल्या आहाराच्या सवयी जर योग्य असतील तर आणि तरच आपलं वजनही आपल्या आटोक्यात राहातं. चमचमीत पदार्थांवर कायम ताव मारला तर आपल्या नर्व्हस सिस्टीमवर तर त्याचा विपरित परिणाम होतोच, पण पाठीचं दुखणंही त्यामुळे वाढू शकतं. जाड्या, अति वजन असलेल्या लोकांना जोडीनं पाठदुखीही असतेच, हे लक्षात घ्या.
 
 
3- तुम्ही कसे झोपता?
झोपण्याची तुमची पद्धत कशी आहे, यावरही पाठदुखी अवलंबून असते. तुम्ही जर पाठीवर किंवा पोटावर झोपत असाल तर पाठदुखी कधी ना कधी तुमची पाठ धरेलच यात शंका नाही. त्यामुळे शक्यतो एका कुशीवर झोपा. त्याचबरोबर तुमच्या आरोग्यासाठी शांत झोपही अतिशय आवश्यक आहे. 
 
4- चालण्या-बसण्याची ढब
तुम्ही कसं चालता, कसं बसता यावरही बरंच काही अवलंबून असतं. घरी काम करताना, ऑफिसमध्ये असताना तुमची देहबोली कशी असते यावरुन पाठदुखी तुमच्या मागे पळत येईल की नाही हे बर्‍याचदा ठरतं. तासन्तास कम्प्युटरवर बसताना, वाकून काम करताना, ऑफिसमध्ये बसताना खूप वाकून काम करू नका. 
 
5- चालताना, बसताना सजग राहा
घरात भांडी उचलताना, भाजीची पिशवी उचलताना, काही वजन उचलताना, ऑफिसमध्ये काम करताना आपली चालण्या-बसण्याची ढब कशी आहे याकडे कायम लक्ष द्या. शरीराची ठेवण योग्य असली तर पाठदुखीला कायमचा रामराम मिळेल नाहीतर पाठदुखी कधीच पिच्छा सोडणार नाही.
6- स्ट्रेचिंग एक्सरसाइज
स्ट्रेचिंग एक्सरसाइज केल्यामुळे असलेली पाठदुखी तर दूर पळेलच, पण भविष्यात होणार्‍या पाठदुखीलाही तुम्ही कायमच आपल्यापासून दूर ठेऊ शकाल. मात्र हे स्ट्रेचिंग एक्सरसाइज आपण योग्य तर्‍हेने करतोय ना, याकडे बारकाईने लक्ष द्या. त्यासाठी तज्ञाची मदत घ्या. त्यामुळे तुमच्या पाठीचे मणकेही सशक्तही बनतील.
 
7- मनावरचा ताण
मनावरचा ताण आपल्या शरीरावरही दिसतोच, हे जागतिक सत्य आहे. पाठदुखीच्या बाबतीतही ते तितकंच खरं आहे. त्यामुळे आपली मन:शांती टिकवून ठेवा. त्यासाठी योगासनं, प्राणायामाचा अभ्यास करा.
 
8- धुम्रपान सोडा
धुम्रपानामुळे हृदयविकार आणि कॅन्सरचा धोका खूप मोठय़ा प्रमाणात वाढतो, हे सगळ्यांनाच माहीत आहे, पण धुम्रपानामुळे इतर जिवघेण्या विकारांबरोबर पाठदुखीही पाठीशी लागते हे फारच कमी जणांना माहीत आहे. धुम्रपानामुळे मोठय़ा प्रमाणात पाठदुखी लागू शकते हे संशोधकांनी अभ्यास करून शोधून काढलं आहे. त्यावरचे प्रयोगही जगभरात झाले आहेत.