बाळासाठी डायपर धोकेदायक?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2016 09:56 IST
आधी लहान बाळांना सूती कापड्याचे नॅपी पॅड लावले जायचे....
बाळासाठी डायपर धोकेदायक?
आधी लहान बाळांना सूती कापड्याचे नॅपी पॅड लावले जायचे, पण त्यास सतत धुवावे लागे. मात्र, मुलांना इन्फेक्शन व्हायचे नाही. सध्या लहान बाळासाठी नॅपी पॅड वापरण्याचा ट्रेंडच आला आहे. मध्यमवर्गीय असो की श्रीमंत जिथे लहान बाळ असेल तिथे नॅपी पॅड खरेदी केले जाते. एका संशोधनातून नॅपी पॅड वापरण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्या बाळाचे आरोग्य धोक्यात येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. केवळ आपल्या सोयीसाठी आपण आपल्या बाळाच्या आरोग्याची हेळसांड करत आहात. खूप वेळ डायपर लाऊन ठेवल्याने बाळाला युरिनल संसर्ग होण्याचा धोका वाढतो. हे संक्रमण झाल्याने बाळाची चिडचिड होते यामुळे ते आक्रमक होण्याचाही धोका असतो. लहान मुलांची त्वचाही संवेदनशील असते. ते पॅड सारखे घासले गेल्याने त्वचा लाल होते आणि खाजही सुटते. नॅपी पॅडमध्ये अनेक रसायनांचा वापर केला जातो आणि त्यात असलेल्या प्लॅस्टीकने हवा खेळती राहत नाही, हेसुद्धा संक्रमणाचे मोठे कारण बनू शकते. असे असले तरीही नेहमी सुती कपडे आपण आपल्या बाळाला वापरू शकत नाही. त्यामुळे जर वापरायचेच असेल तर या काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. डायपर लावले की त्याला वारंवार चेक करत राहा. ३ ते ४ तासांच्यावर डायपर वापरू नका. नॅपी चेंज केल्यानंतर बाळाच्या त्वचेला चांगल्या पद्धतीने साफ करा. त्वचा पूर्णपणे वाळल्यावरच बाळाला दुसरे कपडे घाला.