शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
2
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
3
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
4
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
5
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
7
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
8
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
9
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
10
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
11
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
12
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
13
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
14
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
15
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
16
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
17
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
18
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
19
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
20
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश

मुलांना चष्मा अभ्यासामुळे लागतोय की मोबाइलमुळे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2023 10:51 IST

सतत मोबाइल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे त्याची मुलांना सवय जडत आहे. काही संदर्भात पालकांनी मुलांना मोबाइल न दिल्यास चिडचिड, राग येण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

मुंबई : पूर्वी मुलाला चष्मा असेल तर तो फार अभ्यास करतो, असे म्हटले जात असे. मात्र, अलीकडे मुलांमध्ये चष्म्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी एक वर्षाच्या मुलालाही चष्मा दिसतो. शिक्षणासह मनोरंजनासाठी मुलांमध्ये मोबाइल, लॅपटॉपचा वापर वाढला आहे. त्यामुळे अति अभ्यासामुळे मुलांना चष्मा लागतो आहे की, मोबाइलमुळे असा प्रश्न पालकांना सतावतो.

चिडचिड, राग वाढलासतत मोबाइल आणि लॅपटॉपच्या वापरामुळे त्याची मुलांना सवय जडत आहे. काही संदर्भात पालकांनी मुलांना मोबाइल न दिल्यास चिडचिड, राग येण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. शिक्षणासाठी मुलांच्या हाती सुरुवातीला मोबाइल दिला जातो. त्यातून मुले शिक्षणावर आधारित व्हिडीओ बघतात. त्यानंतर मात्र मुले सोशल मीडियावर सक्रिय झाल्याचे दिसून येत आहेत. खासकरून यू-ट्यूब, फेसबुकसह तत्सम ॲपवरील व्हिडीओ बघण्याकडे त्यांचा कल वाढत आहे. सतत मोबाइल, टॅब किंवा लॅपटॉप बघण्याने विकार वाढल्याचे आढळून आले आहेत.

 मुलांमध्ये मोबाइलचे  आकर्षण का? सामान्यपणे मुले रंग, आकर्षित चित्र किंवा एखादी विशिष्ट वस्तू पाहून आकर्षित होतात. कार्टून, चित्रासह निघणारा प्रकाश त्यांना खूप आवडतो. यामुळे मुले मोबाइलला जवळ करत आहेत. एका खेळण्याप्रमाणे एकरूप होत असून यातून त्यांना त्याची सवय जडत आहे. मोबाइलमधील आवाज आणि स्पर्श मुलांना खूप आवडतो. यामुळे शालेय विद्यार्थ्यांत मोबाइलचे आकर्षण वाढत आहे.

तज्ज्ञ सांगतात आऊटडोअर ॲक्टिव्हिटी महत्त्वाचीमुलांचे मैदानी खेळ, व्यक्तिमत्त्व विकासाचे इतर छंद बंद झाले आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात राहणेही कमी झाले आहे. टीव्ही, मोबाइल, लॅपटॉपचा वापर वाढला आहे. याचा परिणाम दृष्टीवर होतोय. पालकांनी मुलांच्या दृष्टीदोषाकडे वेळीच लक्ष द्यावे. शाळेतही नियमितपणे नेत्र तपासणी झाली पाहिजे. मायनस नंबर असणाऱ्यांसाठी मल्टिफोकल चष्मे आले आहेत. त्यामुळे दृष्टीदोष वाढत नाही. मुलांना शाळेत टाकतानाच नेत्र तपासणी महत्त्वाची ठरू शकते.

मुलांना चष्मा लागण्याची इतर कारणे काय? आनुवंशिक :  आनुवंशिक कारणामुळे म्हणजे आई-वडिलांना चष्मा असेल तर मुलांमध्येही चष्मा लागण्याची शक्यता वाढते. आहार :  सकस आहाराच्या अभावानेही दृष्टीदोष होऊ शकतो. टीव्ही :  टीव्ही पाहण्याचे प्रमाण मुलांमध्ये अधिक आहे. त्यामुळे टीव्हीदेखील चष्मा लागण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

उपाय काय?  मोबाइल, टॅब, संगणक, लॅपटॉप अशा डिव्हाइसचा योग्य आणि थोड्या वेळेसाठीच वापर करावा.  मोबाइल, टॅब, संगणक, टीव्ही लांबून अंतर ठेवून पाहावे.  अभ्यासाव्यतिरिक्त लहान मुलांनी मैदानी खेळावर लक्ष द्यावे.  पौष्टिक आणि चौरस आहार घ्यावा.  सकाळच्यावेळी स्वच्छ सूर्यप्रकाश घ्यावा. वृत्तपत्र वाचन, लेखन, चित्रकला, संगीत, नृत्य, कला इ. छंद जोपासावे.

टॅग्स :eye care tipsडोळ्यांची निगा