शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

जग कोरोनासारख्या आणखी एका संकटाच्या उंबरठ्यावर; WHO कडून धोक्याचा इशारा

By कुणाल गवाणकर | Updated: November 21, 2020 15:53 IST

जागतिक आरोग्य संघटनेनं अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सबद्दल चिंता व्यक्त

जेनेवा: जगातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घट सुरू होती. मात्र दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. काही राज्यांमध्ये केंद्र सरकारनं वैद्यकीय पथकं पाठवली आहेत. तर आणखी काही राज्यांमध्ये पथकं पाठवण्याची तयारी केंद्रानं सुरू केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे परिस्थिती चिंताजनक होत असताना आता जागतिक आरोग्य संघटनेनं धोक्याचा इशारा दिला आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी काय खावं; सांगताहेत प्रसिद्ध शेफ 'पद्मश्री' संजीव कपूरकोरोनासारखं आणखी एक संकट जगासमोर आ वासून उभं आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यास वैद्यकीय क्षेत्राची एक शतकाची मेहनत वाया जाईल, अशी धोक्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सबद्दल चिंता व्यक्त केली आहे. एखाद्या संक्रमणावरील औषधाची परिणामकारकता कमी होण्याच्या स्थितीला अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स असं म्हटलं जातं. याचा अर्थ विषाणू स्वत:मध्ये बदल करतो. त्यामुळे औषध प्रभावी ठरत नाही. विषाणूची प्रतिकारशक्ती वाढल्यानं ही परिस्थिती उद्भवते.कोरोनाविरोधात ज्या औषधाचा झाला होता गवगवा, त्याच्याच वापरावर डब्ल्यूएचओनो आणली स्थगितीअँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढणं कोरोना महामारीप्रमाणेच धोकादायक असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधानोम यांनी म्हटलं. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे वैद्यकीय क्षेत्राचं प्रचंड मोठं नुकसान आहे. एका शतकाची मेहनत यामुळे वाया जाईल. आरोग्य क्षेत्रासाठी हा अतिशय मोठा धोका असेल. विषाणूनं स्वत:मध्ये बदल केल्यास औषध त्यासमोर फारसं प्रभावी ठरत नाही. यामुळे लहान जखमा किंवा संक्रमणदेखील भीषण स्वरूप धारणं करू शकतं, अशी भीती ट्रेडोस यांनी व्यक्त केली.माणूस आणि पशूंवर अधिक प्रमाणात औषधांचा वापर होत असल्यानं गेल्या काही वर्षांत अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स वाढल्याचं ट्रेडोस यांनी सांगितलं. अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स कोणताही आजार नाही. मात्र तो आजाराइतकाच किंबहुना एखाद्या महामारीइतकाच धोकादायक आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रानं एका शतकात केलेल्या प्रगतीवर पाणी फिरेल. आज अतिशय सहजपणे होणाऱ्या संक्रमणांवरील उपचारदेखील अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्समुळे होऊ शकणार नाही, असं ट्रेडोस म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना