शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाला ६-८ महिने उलटलेल्यांमध्ये प्रतिपिंडे कमी; बूस्टर डोसची आवश्यकता, वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 11:30 IST

अन्य देशांत तिसरा डोस देण्यास सुरुवातही झाली आहे शिवाय आयसीएमआरकडून तिसऱ्या डोसचा कितपत फायदा होईल, त्यावर साशंकित मत देण्यात आले आहे; मात्र एक वर्षानंतर अभ्यास करून बूस्टर डोस देण्यात यावा, असे मत डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.

मुंबई : राज्यात काेरोनाची साथ नियंत्रणात आणण्यात लसीकरणाची मोहीम महत्त्वपूर्ण आहे. मात्र, लसीकरण पूर्ण करून सात ते आठ महिने उलटले तरीही, लाभार्थ्यांमध्ये प्रतिपिंडाचे प्रमाण कमी होत  असल्याचे आढळले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या कोरोना टास्क फोर्समधील डॉक्टरांनी बूस्टर डोसची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, बूस्टर डोसविषयी वैद्यकीय तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे आहेत.अन्य देशांत तिसरा डोस देण्यास सुरुवातही झाली आहे शिवाय आयसीएमआरकडून तिसऱ्या डोसचा कितपत फायदा होईल, त्यावर साशंकित मत देण्यात आले आहे; मात्र एक वर्षानंतर अभ्यास करून बूस्टर डोस देण्यात यावा, असे मत डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले. आयसीएमआरने कदाचित वैज्ञानिक अधिष्ठानावर मत मांडले असावे. त्यांच्या मताशी सहमत असल्याचे कोरोना टास्क फोर्स सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले. जगभरात जे संशोधन होत आहे. 

- अमेरिकेच्या एफडीएने केलेल्या संशोधनानुसार लसीकरणानंतर ज्या ॲण्टीबॉडिज तयार होतात. त्या सहा महिन्यांनंतर कमी व्हायला लागतात आणि आठ महिन्यांनंतर त्या पूर्णपणे कमी होतात अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक देशांमध्ये तिसरा डोस दिला जात आहे. भारतात अजूनही कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना बुस्टर डोसची गरज असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले. 

बूस्टर डोस आवश्यक आहे का? उपलब्ध शास्त्रीय पुरावे पाहता, देशात बूस्टर डोसची गरज नसल्याचे आयसीएमआरमधील एपिडेमियोलॉजी आणि संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी सांगितले. आरोग्य मंत्रालय कोणताही निर्णय शास्त्रीय आधारावर घेते. यामध्ये एनटीएजीआय मंत्रालयाला मार्गदर्शन करते. कोणतेही धोरण बनविण्यापूर्वी संबंधित विभाग आणि मंत्रालयांचे मत घेतले जाते. ते पूर्णपणे शास्त्रीय आधारावर आहे. सध्या देशातील वैज्ञानिक पुरावे बुस्टर डोसच्या गरजेवर भर देत नाहीत, असे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस