शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ALERT : ​अशा लोकांची संगत नकोच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2017 18:18 IST

अशा लोकांसोबत राहणे म्हणजे निश्चितच आपला अमूल्य वेळ वाया घालवणे आणि आयुष्याच्या ध्येयापासून परावृत्त होणे होय.

-Ravindra Moreमनुष्य समाजशील प्राणी आहे. या समाजात वावरताना त्यांना असे काही लोक भेटतात ज्यांच्यामुळे आयुष्यात काहीअंशी नकारात्मकता निर्माण होते. अशा लोकांसोबत राहणे म्हणजे निश्चितच आपला अमूल्य वेळ वाया घालवणे आणि आयुष्याच्या ध्येयापासून परावृत्त होणे होय. आजच्या सदरातून कशा प्रकारच्या लोकांपासून दूर राहावे, याबाबत जाणून घेऊया.निंदक‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हटले जाते, मात्र काही निंदक आपल्याबाबत नेहमी कटकारस्थान रचत असतात. तसे निंदक दोन प्रकारचे असतात. काही निंदक आपले भले व्हावे, या हेतूने नकारात्मक गोष्टी निदर्शनास आणून देतात. परंतु दुसऱ्या प्रकारचे निंदक मात्र आपल्याला कमी लेखण्यासाठी निंदा करतात. अशा प्रकारे आपला आत्मविश्वास कमी करणारे निंदक आपल्या अवती-भोवती आढळतात. अशा व्यक्तींना ओळखण्यासाठी त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीकडे लक्ष द्या. कुणी जर नम्रपणे, शांत स्वरात आपली चूक लक्षात आणून देत असेल तर ते आपल्या भल्यासाठी आहे हे लक्षात घ्या. परंतु कुणी जर चारचौघांत, चढ्या आवाजात चूक दाखवून तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा लोकांच्या बोलण्याने स्वत:चा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका, अशा लोकांकडे दुर्लक्ष करा.   मुखवटे मुखवटे घालणारी माणसे ओठात एक आणि पोटात एक असे वागणारी, नाटक करण्यात पटाईत असतात. तुमच्यासोबत असताना ते तुमच्यासमोर गोडीगुलाबीने बोलतील; परंतु पाठीमागे तुमचीच निंदानालस्ती करतील. त्यांचे छुपे हेतू तुमच्या लक्षात येत नाहीत, असे लोक ओळखून त्यांच्यापासून जपून राहा.   हुकूमशहाहे लोक प्रत्येक ठिकाणी स्वत:चे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे असतात. आत्मकेंद्री, अतिमहत्त्वाकांक्षी व नाटकी असतात. अशा लोकांपासून अंतर ठेवून राहा. आनंदावर विरजण घालणे या लोकांना चांगले जमते.   शिकार  स्वत:ची चूक कधीही मान्य न करणाऱ्या लोकांमध्ये राहू नका, असे लोक आपल्या चुकीचे खापर इतरांच्या डोक्यावर फोडतात व सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही त्यांचा दोष उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला तर ते पीडित असल्याचा आव आणतात. यामुळे अशा लोकांचे जास्त मित्र नसतात.   खोटारडे  खोटे बोलण्याच्या कलेत अशा प्रकारचे लोक बालपणापासून पारंगत असतात. गैरसमज निर्माण करण्यात व नात्यांमध्ये दुरावा तयार करण्यामागे यांचा मोठा हात असतो. कुठल्याही भीतीशिवाय हे लोक खोटं बोलतात.   चुगलखोरवरील पाच लोकांचा सामना करणे तुलनेने सोपे आहे; परंतु चुगलखोर लोकांचा सामना करणे अत्यंत कठीण काम आहे. इतरांविषयी आपलेपणाची भावना नसलेले हे लोक नेहमी चुगल्या करताना आढळतात. अशा चुगल्या पुढे संकटाला आमंत्रण देणाऱ्या ठरत असल्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणे बरे.