शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

Alert : ​अति प्रमाणात व्यायाम करणाऱ्यांनो व्हा सावधान, बनू शकणार नाही वडील !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 12:23 IST

तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ कठिण मेहनत केल्याने पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते, ज्याचा परिणाम महिलांच्या गर्भावस्थेवर होतो त्यामुळे मुले जन्माला येऊ शकत नाही. जाणून घ्या सविस्तर...

-रवीन्द्र मोरे सेलिब्रिटी ज्या पद्धतीने जिममध्ये मेहनत घेतात, त्याला शास्त्रीय आधार असतो, त्यांचे वेळेचे नियोजन ठरलेले असते. विशेष म्हणजे प्रत्येक सेलिब्रिटी तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनानुसारच जिममध्ये वर्कआउट करतात, शिवाय त्यांचा डायट प्लॅनही ठरलेला असतो. म्हणून त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळतो. त्यांचेच अनुकरण करून आपलीही बॉडी सेलिब्रिटींसारखी असावी, त्यांच्या सारखे आपलेही मसल्स, सिक्स अ‍ॅब्स असावेत, असे सध्याच्या तरुणाईला वाटते. त्यासाठी बहुतांश तरुण रात्रंदिवस जिममध्ये जाऊन मेहनत करतात. बरेच तरुण तर लवकरात लवकर पिळदार शरीर बनण्याच्या प्रयत्नात अति प्रमाणात मेहनत घेतात. त्यांना  मात्र अति प्रमाणात केलेली ही मेहनत पुरुषांना महागात पडू शकते, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. सोबतच स्टेरॉइडचाही प्रयोग करीत असतील तर वांझपणा (इनफर्टाइल) देखील येऊ शकतो, असे आयव्हीएफ हॉस्पिटलचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तज्ज्ञांच्या मते, जास्त वेळ कठिण मेहनत केल्याने पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या कमी होते, ज्याचा परिणाम महिलांच्या गर्भावस्थेवर होतो त्यामुळे मुले जन्माला येऊ शकत नाही. वांझपणा वाढविण्यासाठीच्या अन्य घटकांपैकी एक घटक म्हणजे बॉडी बिल्डिंगसाठी वापरण्यात येणारे स्टेरॉइड होय, ज्यामुळे ‘जूस्पर्मिया’ नावाचा आजार होतो. जूस्पर्मिया झाल्यानंतर शुक्राणूंची निर्मिती होणे थांबते. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार सुमारे एक टक्के भारतीय पुरुष ‘जूस्पर्मिया’ या आजाराने प्रभावित आहेत.   इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे तज्ज्ञ अरविंद वेद यांनी सांगितले की, असे बरेच लोक आहेत जे बॉडी बिल्डिंगसाठी अति प्रमाणात मेहनत घेतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी होत असते.जर कोणी मेहनत करुन जास्त थक त असेल, तर त्या पुरुषाच्या तुलनेत सामान्य मेहनत करणाºयामध्ये शुक्राणूंची संख्या जास्त असते.  आयव्हीएफ विशेषज्ञ रेखा गोस्वामी यांच्या मते, अति प्रमाणात मेहनत घेण्याऱ्यांमध्ये वांझपणाची समस्या जास्त काळ टिकून राहते, मात्र विना डॉक्टरांच्या सल्लयाशिवाय जे स्टेरॉइडचे सेवन करतात, त्यांच्यासाठी जास्त धोकादायक असल्याचे त्यांनी सांगितले.Also Read : ​Fitness : ​बॉडी बिल्डिंगचे हे आहेत ‘५’ मोठे गैरसमज, सर्वांना वाटतात सत्य !