शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

​मद्य सेवनाने वाढतो हृदयविकाराचा धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 11:25 IST

बहुतांश लोकांना मद्य सेवनाची सवय जडली आहे. मात्र आपण जर रोजच मद्य सेवन करत असाल तर ही सवय आपल्यासाठी घातक ठरु शकते. मद्य सेवनाने केव्हाही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते...

बहुतांश लोकांना मद्य सेवनाची सवय जडली आहे. मात्र आपण जर रोजच मद्य सेवन करत असाल तर ही सवय आपल्यासाठी घातक ठरु शकते. मद्य सेवनाने केव्हाही हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते, तसेच हृदयासंबंधित इतर आजार बळावण्याचीही शक्यता आहे, असे अमेरिकन संशोधकांनी सांगितले.कमी प्रमाणातही अल्कोहोलच्या सेवनामुळे हृदयविकार होत नाही, असे अनेक संशोधकांनी म्हटले आहे. मात्र अमेरिकेच्या या संशोधकांनी हा मुद्दा खोडून काढला आहे. अल्कोहोलचे कमी किंवा अति प्रमाण हे आरोग्याला हानिकारकच असल्याचे म्हटले आहे.यूसीएसएफचे जॉर्ज मारकस यांच्या म्हणण्यानुसार, अल्कोहोलचे मर्यादित सेवन हे हृदयविकाराविरोधात उपयुक्त असल्याचा दाखला वेगवेगळ्या संशोधनातून बऱ्याचदा देण्यात आला आहे, पण संशोधनातील काही निष्कर्षांतून अल्कोहोलच्या सेवनातून हा धोका अधिक बळावत असल्याचे स्पष्ट होत आहे.अल्कोहोलच्या सेवनामुळे उत्तेजित होणे किंवा छातीत धडधडल्यामुळे हा धोका अधिक बळावत असल्याचे लाखो रुग्णांच्या परीक्षणातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन हे मुळातच हृदय आणि हृदयाच्या रक्तवाहिन्या यांच्यासाठी हितकारक नसून उलट तो विषारी घटक आहे. संशोधकांनी १४ कोटी ७२ लाख ७ हजार ५९१ लोकांच्या केलेल्या सर्वेक्षणातूनदेखील हेच सिद्ध होताना २६ लाख ८ हजार ८४ म्हणजे १.८ टक्के लोक हे अल्कोहोलच्या घातक परिणामांचे बळी ठरल्याचे स्पष्ट होत आहे. हे सर्वेक्षण ‘अमेरिकन कॉलेज कार्डिओलॉजी’ (जेएसीसी) या जनरलमधून प्रसिद्ध झाले आहे.