शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
4
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
5
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
6
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
7
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
8
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
9
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
10
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
11
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
12
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
13
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
14
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
15
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
16
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
17
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
18
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
19
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
20
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?

अकुलजची हिरोईन, तालमीतला हिरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 16:03 IST

डॅशिंग हिरोईन शोधताना अकलूजमधील एका शाळकरी मुलीमध्ये दिसलेली आर्ची, तालमीमध्ये शोधलेला देखणा नायक, करमाळा परिसरात झालेले शूटिंग आणि हॉलिवूडमध्ये झालेले रेकॉर्डिंग असलेल्या ‘सैराट’चा प्रवास लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उलगडला. चित्रपटातील परशा असो की आर्ची, सगळ्यांमध्ये मीच आहे, असे सांगत समाजातील दाहक वास्तवाचे चित्रण करण्यामागची भूमिकाही त्यांनी मांडली. ‘सैराट’च्या टीमने लोकमत कार्यालयाला भेट दिली. मंजुळे यांच्यासोबत चित्रपटातील हिरो-हिरोईन आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या वेळी उपस्थित होते.

डॅशिंग हिरोईन शोधताना अकलूजमधील एका शाळकरी मुलीमध्ये दिसलेली आर्ची, तालमीमध्ये शोधलेला देखणा नायक, करमाळा परिसरात झालेले शूटिंग आणि हॉलिवूडमध्ये झालेले रेकॉर्डिंग असलेल्या ‘सैराट’चा प्रवास लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी उलगडला. चित्रपटातील परशा असो की आर्ची, सगळ्यांमध्ये मीच आहे, असे सांगत समाजातील दाहक वास्तवाचे चित्रण करण्यामागची भूमिकाही त्यांनी मांडली. ‘सैराट’च्या टीमने लोकमत कार्यालयाला भेट दिली. मंजुळे यांच्यासोबत चित्रपटातील हिरो-हिरोईन आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू या वेळी उपस्थित होते.  ‘सैराट’ची कहाणी सांगताना समाजाचे वास्तवच मांडताना आपल्या आयुष्यातील घटनांचा संदर्भ देत मंजुळे म्हणाले, ‘‘रूढ परंपरांना छेद देणारी नायिका हवी होती. कारण यातील आर्ची म्हणजे एकदम बिनधास्त आहे. मुलीने बिनधास्त का असू नये? लाजरंबुजरंच का असावं? एखादा मुलगा तिला आवडला तर तिने स्पष्टपणे का सांगू नये? हे प्रश्न मला पडले. अगदी तशीच आर्ची रिंकूने रंगवली आहे. आर्चीचा शोध घेण्यासाठी मी अनेक आॅडिशन घेतल्या. एकदा अकलूजला गेलो होतो. शाळकरी वयातील रिंकू वडिलांबरोबर भेटायला आली. तिला पाहिलं आणि जाणवलं हिच आर्ची.’’  चित्रपटातील नायक परशा शोधण्यासाठीही पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये फिरलो. शेवटी पुण्याचाच असणारा, पण करमाळ्यात तालमीसाठी गेलेला आकाश दिसला. आर्चीपेक्षा परशा देखणा हवा होता. त्याचे कॅरेक्टरही साधे आहे. मुलगा म्हटला, की तो डॅशिंगच का पाहिजे? हा प्रश्न येथेही होता.’’या दोन वेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून पारंपरिक विचारात जखडलेल्या सामाजात हळुवार फुलणारी प्रेमकथा सैराट या चित्रपटामधून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘सैराट’ हा फॅन्ड्रीचा सिक्वेल नाही. काही धागे यामध्ये सापडतीलही. कारण मी स्वत:ला मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सैराट म्हणजे मुक्तपणा आहे. मोकळीक मिळणे आणि आपल्या मनाला जे वाटेल ते करणे म्हणजे सैराट. त्यामुळे तोच मोकळेपणा या चित्रपटातून दिसणार आहे.येत्या २९ एप्रिल प्रदर्शित होणार आहे.                     करमाळ्यातील कथेला वैश्विक परिमाण४‘सैराट’चे  स्क्रीनिंग बर्लिनमध्ये झाले होते. खूप मोठे कल्चरल सेंटर होते. वाटले लोक कशाला येताहेत? पण, गोष्ट कोणाचीही असली तरी वैश्विक परिमाण असेल तर ती सगळ्यांना आवडते. संपूर्ण सभागृह भरले होते, असे मंजुळे यांनी सांगितले.  जातपात, रूढीपरंपरांना चित्रमय भाषेत उत्तर४जातपात, रूढीपरंपरा, समाज या गोष्टी समाजात दिवसेंदिवस जास्त तीव्र होत चालल्या आहेत. समाज मुला-मुलींचे  प्रेम  स्वीकारायला तयार होत नाही. प्रत्येक आई-वडीलही एके काळी तरुण होते. त्यांनीही कधीतरी प्रेम केले असेल; पण जातीपातीच्या बंधनात अडकून त्यांनी माघार घेतली. त्यामुळे वास्तव शोधण्याचा प्रयत्न ‘सैराट’मधून केला. दोन माणसे एकमेकांवर प्रेम करतात, त्यांना मोकळेपणाने वावरण्याची संधी या समाजात नाही. सैराट’मय अजय-अतुलचे झिंगाटप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांना ‘सैराट’ची कथा ऐकवली आणि ते ‘सैराट’मय झाले. वर्ष-दीड वर्ष ते केवळ ‘सैराट’चा विचार करीत होते. काहीही चांगल सुचलं, की सैराटसाठी ठेवत होते. एकदा तर दुसºया एका चित्रपटाचे रेकॉर्डिंग सुरू असताना त्यांना एक कल्पना सुचली. लगेच बाहेर आले आणि फोन करून त्यांनी सांगितली. ‘झिंगाट’ गाण्याने सध्या तरुणाईला याड लावलंय. हे गाणेही अजय-अतुल यांनी लिहिले आहे. त्यांना स्वत:ला ग्रामीण भाषेचा बाज माहिती आहे. त्यामुळे गाणं चित्रपटात अगदी चपखल बसलंय. ते आणखी चांगलं व्हावं यासाठी हॉलिवूडमध्ये या गाण्याचं रेकॉर्डिंग केलं. या दोघांनी अफलातून काम केलं आहे. आता प्रेक्षक गाण्यांच्या प्रेमात पडलायं; पण चित्रपटातील बॅक्ग्राऊंड म्युझिक आणखी जास्त आवडेल, असे मंजुळे यांनी सांगितले. झिंगाट’च्या जोशपूर्ण नाचाची कथा४‘झिंगाट’ गाण्यावरील जोशपूर्ण गाण्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आकाश म्हणाला, ‘‘हा खरं तर फुलआॅन गणपती डान्स; पण तो नागराज मंजुळे यांनी जोशपूर्ण करून घेतला आहे.’’ आकाश ठोसर म्हणतो, ‘‘झिंगाटच्या वेळी  शूट करताना माझे मित्र मला ड्रिंक केलंय का, हेदेखील विचारायचे. पण, ते गाणंच असं असल्यामुळे आम्ही फुलआॅन गणपती डान्स केला.’’ मंजुळे म्हणाले, ‘‘शूटिंग सुरू असताना आकाश, रिंकू आणि  परशाची भूमिका करणारा मुलगा जो खरोखर अपंग आहे ते नाचायचे. त्यांना सांगितलं, की तशाच स्टेप ठेवा. ताजेपणा असल्यानं प्रेक्षकांना तो पसंत पडत आहे.’’रिंकूने वाढविले वजन४सातवीतील रिंकू पाहिली आणि नागराज मंजुळेंना आर्ची सापडली. मात्र, त्यांनी वर्षभर तिच्याकडून तयारी करून घेतली. आठ-नऊ किलो वजन वाढविण्यास सांगितले. रिंकू म्हणाली, ‘‘मुली कशा बोलतात, कशा बघतात हे मला कळायचं नाही. नागराजदादाने माझे खाणेपिणे, व्यायाम कसा करायचा, हे सांगितले आणि एका वर्षाने मला बोलावले. डिसेंबर २०१३मध्ये मला या चित्रपटासाठी ‘तुला निवडले’ असे सांगण्यात आले.’’