शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर आता गोवरचं संकट, ४८ तासांत ३ मुलांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 14:44 IST

मुंबईतील गोवंडी भागात ३ मुलांच्या मृत्यूनं गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पथक मुंबईला पाठवलं.

मुंबई - भारतात अचानक गोवरचा प्रकोप पाहायला मिळत आहे. ४८ तासांमध्ये ३ मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. हे तिघे एकाच कुटुंबातील असल्याचं कळतंय. सध्या गोवर आजारामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गोवर आजारावर ठोस उपचार नाहीत. त्यामुळे या आजाराची लक्षणं जाणून घेणे गरजेचे आहे जेणेकरून वेळीच वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते. 

मुंबईतील गोवंडी भागात ३ मुलांच्या मृत्यूनं गोवर आजाराबाबत चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं बुधवारी पथक मुंबईला पाठवलं. या केंद्रीय पथकात नवी दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, पुणे येथील तज्ज्ञांचा समावेश आहे. ज्याचं नेतृत्व डॉ. अनुभव श्रीवास्तव करत आहेत. TOI रिपोर्टनुसार, गोवर हा संसर्गजन्य रोग असून कमी काळात त्याचे २९ हून अधिक रुग्ण आढळले. 

अहवालानुसार, २९ संक्रमित मुलांपैकी जवळपास ५० मुलांना गोवरची लस देण्यात आली होती. ज्यात काही मुलांना ९ महिन्याहून कमी वयात ही लस दिली आहे. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी म्हटलं की, आम्ही गोवरच्या या प्रकोपाबाबत पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीसोबत रिसर्च करत आहोत. गोवर व्हायरस कुठल्या स्ट्रेनमुळे आलाय का याचा शोध घेतला जात आहे. 

काय आहेत गोवरची लक्षणे?सीडीसीनुसार, गोवरचा धोका सर्वाधिक लहान मुलांना आहे. संक्रमितांच्या संपर्कात येताच ७ ते १४ दिवसांमध्ये या आजाराची ४ प्रमुख लक्षणे दिसतात. त्यात १०४ डिग्रीपर्यंत ताप, खोकला, नाकातून सर्दी वाहणे, लाल डोळे, डोळ्यातून पाणी येणे. जेव्हा संक्रमित मुलांमध्ये गोवरची लक्षणे दिसतात त्यानंतर २-३ दिवसांत तोंडात छोटे छोटे सफेद डाग येतात. शरीरावर लाल रंगाच्या खूणा दिसतात. गोवरपासून बचावासाठी एकमेव उपाय म्हणजे लसीकरण, अद्याप या रोगावर कुठलेही औषध नाही. संक्रमित मुलांची काळजी घेणे, दुसऱ्या मुलांपर्यंत जाण्यास रोखणे, पाणी, ज्यूस पाजणे, स्वच्छता ठेवणे यासारखे उपचार करायला हवेत.