शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नाव आठवत नाही? वरण-भात, भाजी-पोळी खा!; अमेरिकेच्या संशोधनातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 07:26 IST

पाश्चात्त्य आहारपद्धतीचा वापर करणाऱ्या देशांमध्ये अल्झायमर आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे

नवी दिल्ली : पाश्चिमात्य आहारपद्धतीच्या तुलनेत भारत, जपान, चीनसारख्या देशांमध्ये प्रचलित असलेल्या पारंपरिक आहारपद्धतीमुळे अल्झायमर होण्याचा धोका कमी होण्याची शक्यता आहे, असा निष्कर्ष एका संशोधनातून काढण्यात आला आहे.

अमेरिकेतील सनलाइट, न्यूट्रिशिअन अँड हेल्थ रिसर्च सेंटरने हे संशोधन केले. त्याबाबत जर्नल ऑफ अल्झायमर डिसिज या नियतकालिकात एक लेख प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले आहे की, पाश्चात्त्य आहारपद्धतीचा वापर करणाऱ्या देशांमध्ये अल्झायमर आजार होण्याचे प्रमाण वाढत आहे

फारशा शारीरिक हालचाली नसणे धोकादायकसंशोधकांनी म्हटले आहे की, फारशा शारीरिक हालचाली न करणे तसेच स्थूलता यांच्यामुळे अल्झायमर होण्याचा धोका वाढतो. आपली जीवनशैली तसेच आहारपद्धती या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे लोकांनी चुकीच्या जीवनशैलीचा अंगीकार करणे टाळले पाहिजे. वनस्पतीजन्य आहारपद्धतीमुळे शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळतात, असेही संशोधकांनी सांगितले.

मधुमेह का वाढतो?प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमुळे स्थूल तसेच मधुमेह होण्याचा धोका वाढतो. अल्झायमर होण्यासाठी हे खाद्यपदार्थ कारणीभूत ठरू शकतात. वनस्पतीजन्य खाद्यपदार्थांमध्ये असलेले व अल्झायमरला दूर ठेवणारे घटक प्रक्रिया केलेल्या खाद्यपदार्थांमध्ये आढळून येत नाहीत, असे हार्वर्ड विद्यापीठातील न्यूट्रिशिअन, प्रा. एडवर्ड गिओवानुस्सी यांनी सांगितले.

काय खाल तर वाढेल धोका?चरबीयुक्त पदार्थांचे जास्त प्रमाणात होणारे सेवन, रेड मीट (लाल मांस), हॅम्बर्गर, बार्बेक्यू, हॉट डॉग्ज, साखरेचे अधिक प्रमाण असलेले पदार्थ अशा गोष्टी आहारात असतील तर त्यामुळे अल्झायमर आजार होण्याचा धोका वाढतो. मीटमुळे शरीरात इन्सुलिनला प्रतिरोध, जळजळ अशा अनेक गोष्टींमध्ये वाढ होऊन हा आजार होण्याची शक्यता वाढते. मात्र, हिरव्यागार भाज्या, फळे तसेच भाज्या, ओमेगा-३ फॅटी असिड, विविध प्रकारची धान्ये यांच्यामुळे अल्झायमर होण्याचा धोका कमी होतो, असे या संशोधनातील निष्कर्षांत म्हटले आहे