शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

थंडीतील साधे इन्फेक्शन थांबवू शकते हृदय, हृदयरोग तज्ज्ञांचे निरीक्षण

By सुमेध वाघमार | Updated: January 19, 2024 10:01 IST

थंडीच्या दिवसांत ‘क्लॉटिंग फॅक्टर’ अधिक कार्यरत असल्याने गुठळी (क्लॉट)  बनण्याची शक्यता अधिक असते.

नागपूर : हिवाळ्यातील वातावरण जरी आल्हाददायक वाटत असले तरी याच दिवसांत विशेष काळजी घ्यावी लागते. थंडीच्या ऋतूत हृदयविकार आणि ‘ब्रेन स्ट्रोक’चे प्रमाण वाढते. विशेष म्हणजे, हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सुमारे ३० ते ३५ टक्क्यांनी वाढते, सोबतच एक अंशांपेक्षा तापमान कमी झाल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक व इन्फेक्शनमुळे होणारे मृत्यू ‘०.५’ टक्क्यांनी वाढतात, असे निरीक्षण हृदयरोग तज्ज्ञ डॉ. पंकज हरकुट यांनी नोंदविले आहे.  

‘रिस्क फॅक्टर’ कमी करा स्वत:चे जोखीम घटक (रिस्क फॅक्टर) कमी करण्यावर भर द्यावा. रक्तदाब व मधुमेह  नियंत्रणात ठेवावा. योग्य आहार घ्यावा. लोकरीचे कपडे घालावे. सोबतच नियमित व्यायाम आणि ज्यांना जुने आजार आहे त्यांनी, ‘इन्फ्ल्यूएंजा’ आणि ‘निमोकोकल’ लसी घ्याव्यात.   

‘क्लॉट’ बनण्याची शक्यता वाढते थंडीच्या दिवसांत ‘क्लॉटिंग फॅक्टर’ अधिक कार्यरत असल्याने गुठळी (क्लॉट)  बनण्याची शक्यता अधिक असते. थंडीत जर ‘इन्फेक्शन’ झाले, तर हृदयावर ताण पडू शकतो. परिणामी, हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. ज्यांना हृदयविकाराचा अधिक धोका आहे, जसे अनियंत्रित मधुमेह व उच्च रक्तदाब, लठ्ठपणा अशांना हृदयविकाराचा धोका अधिक संभवतो. थंडीत व्यायाम व शारीरिक हालचाल कमी होते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते व हृदयविकाराची शक्यता वाढते.  

थंडीत रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. याशिवाय घाम कमी येतो. त्यामुळे रक्तदाबात वाढ होते. यामुळे हृदयावर ताण येतो. अशा वेळी हृदयांना रक्तपुरवठा करणाऱ्या धमण्यांमध्ये असलेली ब्लॉकेजेस तुटून तेथे गुठळी (क्लॉट) बनते व हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता बळावते - डॉ. पंकज हरकुट, हृदयरोगतज्ज्ञ

टॅग्स :Heart DiseaseहृदयरोगHealthआरोग्य