शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मलेरियामुळे ५ वर्षांत ७८ मृत्यू; ७२ हजार जणांना लागण; वेळीच लक्षणं ओळखा, उपचार घ्या

By संतोष आंधळे | Updated: April 25, 2024 07:59 IST

वेळीच लक्षणे ओळखून उपचार घेण्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे आवाहन

मुंबई : शहरातील इमारतीचे बांधकाम, तसेच रस्त्याच्या डागडुजीचे काम वर्षभर सुरू असते. यामुळे विशेष करून पावसाळ्यात मलेरियासारख्या आजाराची साथ पसरते. त्यामुळे रुग्णाची संख्या वाढते. सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत  या आजारामुळे ७८ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ७२ हजारांपेक्षा अधिक रुग्णांना याची लागण झाली आहे. हा आजार झाल्यानंतर त्याची वेळीच काळजी घेणे गरजचे आहे. अन्यथा गुंतागुत निर्माण हाेऊन हा आजार जीवघेणा ठरत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 

डास चावल्यामुळे होणारा मलेरिया हा आजार असून, ॲनाफिलीस डासाच्या प्रजातीमधील मादी डासामुळे होतो.  ही मादी डास साठलेल्या पाण्यामध्ये वास्तव्य करून अंडी घालत असल्यामुळे या आजराचा  त्रास होऊ नये, म्हणून या डासांची उत्पत्ती स्थळे नष्ट करून परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. या आजारांमध्ये  रुग्णाच्या शरीरात रक्तामधील प्लेटलेट्सचे प्रमाण कमी होत जाते. काही वेळा उपचाराचा भाग म्हणून बाहेरून सुद्धा प्लेटलेट्स दिल्या  जातात. जागतिक आरोग्य संघटनेकडून दरवर्षी २५ एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस साजरा केला जातो. मलेरिया आजाराबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

बचाव कसा कराल ?लहाने मुले आणि गर्भवती स्त्रिया यांना या आजाराचा धोका सर्वात जास्त प्रमाणात असतो, कारण या दोघांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. डास एका जागी बसू नये, म्हणून घरात पंखा, एसीचा वापर करावा, तसेच संध्याकाळच्या वेळेत दरवाजे बंद असावेत, तसेच खिडक्यांना जाळ्या बसून घ्याव्यात, असे डॉक्टर सांगतात. तसेच, डास मारण्याच्या औषधाचा वापर करावा. झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा.

मलेरियाची लक्षणे कोणती?ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि थंडी वाजणे, खूप ताप येणे. मलेरियाचा डास चावल्यानंतर १०-१५ दिवसांत ही लक्षणे दिसतात.

मलेरियाचे चार प्रकार आहेत. त्यानुसार आपण औषधे रुग्णांना देतो. मलेरिया सुरुवातीच्या काळात व्यवस्थित उपचार घेतला, तर पूर्णपणे बरा होऊ शकतो. मलेरियाच्या अधिक गुंतागुंतीमुळे त्याचा परिणाम शरीरावरील विविध अवयवांवर होऊन तो रुग्ण मृत पावल्याच्या घटना घडतात. विशेषकरून मलेरियाचा यकृत, फुप्फुस, मेंदूवर परिणाम होतो. काही वेळा रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलही करावे लागते. आजूबाजूच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. - डॉ. मधुकर गायकवाड, सहयोगी प्राध्यापक, औषध वैद्यक शास्त्र, सर जे. जे. रुग्णालय.

टॅग्स :Malariaमलेरिया