शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

राज्यात ६७८ पॉझिटिव्ह रुग्ण (जोड बॉक्स)

By admin | Updated: February 20, 2015 01:10 IST

बॉक्स...-राज्यात सर्वात जास्त मृत्यू नागपूर जिल्ह्यातडॉ. सावंत यांनी सांगितले, राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूने ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ४० टक्के मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. शहरात २२ तर ग्रामीण भागात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातच मध्य प्रदेशातील सहा रुग्णांचा नागपुरात मृत्यू झाला आहे. असा एकूण ३१ रुग्णांचा मृत्यू ...


बॉक्स...
-राज्यात सर्वात जास्त मृत्यू नागपूर जिल्ह्यात
डॉ. सावंत यांनी सांगितले, राज्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूने ८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातील ४० टक्के मृत्यू एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. शहरात २२ तर ग्रामीण भागात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यातच मध्य प्रदेशातील सहा रुग्णांचा नागपुरात मृत्यू झाला आहे. असा एकूण ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नागपूर विभागात चंद्रपूरमध्ये दोन, वर्धेत दोन आणि गोंदियात दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

बॉक्स...
-मेडिकलमध्ये ३९ रुग्ण भरती
मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात ३० रुग्ण तर लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात ९ रुग्ण असे ३९ रुग्ण भरती आहेत. यात १७ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. महानगरपालिकेच्यावतीने १० तपासणी केंद्र उघडण्यात आले आहेत. यात रुग्णाचे अ, ब आणि क असे वर्गीकरण करून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २५ हजार २७१ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती, डॉ. सावंत यांनी दिली.

बॉक्स...
-१०९ रुग्णांना घेऊन संचालकांचा घूमजाव
स्वाईन फ्लूविषयी माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी गुरुवारी १०९ रुग्ण आढळून आल्याची माहिती दिली. डॉ.पवार यांनी सुरुवातीला हे सर्व रुग्ण पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली, परंतु सार्वजनिक आरोग्यमंत्री यांनी यात हस्तक्षेप करताच हे रुग्ण संशयित असल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. रुग्णांच्या आकडेवारीत डॉ. पवार यांनी घूमजाव केल्याने यात मोठा गोंधळ असल्याचे यावरून दिसून येते.

बॉक्स...
-आरोग्यमंत्र्यांची स्वाईन फ्लूच्या वॉर्डाकडे पाठ
नागपूरसह संपूर्ण राज्यात स्वाईन फ्लूची साथ अजूनही नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. राज्यात सर्वात जास्त रुग्ण मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत मेडिकलमध्ये आले. बैठक घेतली. परंतु स्वाईन फ्लू वॉर्डाला भेट न देताच निघून गेले. यामुळे आरोग्य विभागाच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या खात्याकडून ते वॉर्डाची पाहणी करणार आहे, अशा सूचना मिळाल्या होत्या. त्या दृष्टीने तयारी करून ठेवण्यात आल्याची माहिती आहे.