शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई पालिकेच्या पाच रुग्णालयांत ४३९ डॉक्टरांच्या जागा रिकाम्या

By संतोष आंधळे | Updated: August 22, 2023 10:39 IST

३२३ डॉक्टरांना नेमले कंत्राटावर, रिक्त जागा भरण्याला मुहूर्त मिळेना

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई:  मुंबई महापालिकेच्या अखत्यारीतील चार वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या नायर, नायर डेंटल, केईएम, सायन व कूपर रुग्णालयातील अध्यापकांच्या एकूण १६०६ पदांपेकी ४३९ पदे (२७ टक्के) रिकामी असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या एकूण जागांतील ३२३ पदांवर (२० टक्के) असणारे डॉक्टर्स हे कंत्राटी पद्धतीने भरले गेले असून ते अनेक वर्षे काम करत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाला डॉक्टरांच्या रिकाम्या जागा भरण्यासाठी केव्हा मुहूर्त मिळणार, असा संतप्त सवाल डॉक्टरांकडून विचारला जात आहे. 

मुंबई वा राज्यातूनच नव्हे तर बाहेरच्या राज्यांमधूनही हजारो रुग्ण मुंबईतील या रुग्णालयांमध्ये येत असतात. नियमितपणे ही पाचही रुग्णालये रुग्णांनी तुडुंब भरून वाहत असतात. अनेक शस्त्रक्रियांची प्रतीक्षा यादी या रुग्णालयांमध्ये आहे. सीटी  आणि एमआरआयच्या चाचण्यांसाठी महिनाभर वेळ मिळत नाही, अशी स्थिती असताना डॉक्टर भरतीबद्दल कंत्राटी विचारसरणी काय कामाची, असाही सवाल केला जात आहे.

ज्यावेळी डॉक्टरांची भरती निघेल त्यावेळी कंत्राटी तत्त्वावर काम करणाऱ्या डॉक्टरांना घेऊ असे सांगण्यात येत आहे. मात्र, सरकारी सेवेत समाविष्ट होण्याचे वय खुला वर्गासाठी ३८ तर आरक्षित वर्गासाठी ४३ आहे. अनेक डॉक्टरांचे वय आता निघून जाण्याच्या मार्गावर आहे. सरासरी पाच ते सात वर्षांपासून डॉक्टर कंत्राटी पदावर काम करत आहेत. इतकेच नव्हे तर काही डॉक्टर कंटाळून सोडून गेले आहेत.

वैद्यकीय महाविद्यालयांशी संबंधित रुग्णालयात डॉक्टर भरतीचे पहिले पद म्हणजे सहाय्यक प्राध्यापक असे असून या प्राध्यापकावर रुग्ण तपासण्याची प्राथमिक जबाबदारी असते. महापालिकेत गेली अनेक वर्षे सहाय्यक प्राध्यापक पदासाठी भरती झालेली नाही. गेली अनेक वर्षे या पदावर कंत्राटी तत्वावर डॉक्टरांची भरती केलेली आहे.

या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?

  1. सरकारी सेवेत समाविष्ट होण्याचे वय निघून गेल्यावर काय करणार ? 
  2. ५ ते ७ वर्ष काम केलेल्या कंत्राटी डॉक्टरांना मिळणारे वेतन आणि नुकतेच पदव्युत्तर पदवी पास केलेल्या बॉन्डेड डॉक्टरांचे वेतनसारखेच कसे ? 
  3. डॉक्टरांच्या मोठ्या संख्येने जागा रिक्त आहेत मग जाहिरात का काढत नाही ?  
  4. गेली पाच वर्ष पदभरती का गेली नाही ? 
  5. नियमित डॉक्टरांप्रमाणे कंत्राटी डॉक्टरांना रजा का नाही?

बिंदुनामावली बनविण्याचे काम सुरू आहे. सर्व पदांचा आढावा घेतला जात आहे. त्यानंतर लवकरच  रिकाम्या पदाची जाहिरात काढून एमपीएससीमार्फत ही पदे भरण्यात येणार आहेत. फाईल मंत्रालयीन स्तरावर आहे. सहायक प्राध्यापकाची पदे भरण्यासाठी प्राध्यान्य देण्यात येणार आहे.- डॉ सुधाकर शिंदे, अतिरिक्त महापालिका आयुक्त

टॅग्स :MumbaiमुंबईHealthआरोग्यdoctorडॉक्टर