वर्षभरात ४२ हजार जन्म नोंदणी
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
जन्म-मृत्यू नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक असताना याकडे नागरिकांकडून दूर्लक्ष केले जात आहे़ वर्षभरात केवळ ४२ हजार ६५० जन्मनोंदणी झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे़
वर्षभरात ४२ हजार जन्म नोंदणी
जन्म-मृत्यू नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक असताना याकडे नागरिकांकडून दूर्लक्ष केले जात आहे़ वर्षभरात केवळ ४२ हजार ६५० जन्मनोंदणी झाल्याची नोंद महापालिकेच्या दप्तरी आहे़नांदेड महापालिकेच्या हद्दीत होणार्या जन्म-मृत्यूची नोंद महापालिकेच्या आरोग्य विभागात घेतली जाते़ नागरिकांच्या सोयीसाठी मुख्य कार्यालयाबरोबरच सर्व क्षेत्रीय कार्यालयात जन्म-मृत्यूची नोंद घेण्याची सुविधा उपलब्ध आहेत़ दवाखान्यात होणार्या जन्म-मृत्यूची नोंद ऑनलाईन पद्धतीने करुन अविरत केंद्रातून मागणीप्रमाणे प्रमाणपत्र वितरीत केले जातात़ २०१४ मध्ये वर्षभरात ४२ हजार ६५० जन्मांची नोंद झाली़ यात २२ हजार ४९२ मुले तर २० हजार १५८ मुलींचा समावेश आहे़ ४ हजार ५२५ मृत्यूची नोंद झाली असून यात ३१३७ पुरुष तर १ हजार ३८८ स्त्रीयांचा समावेश आहे़ या वर्षात स्त्री लिंग गुणोत्तर ८९६़२२ इतकी नांेद झालेली आहे़ गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते़ महापालिकेच्या हद्दीत असलेले दवाखाने, प्रसुतीगृह, शासकीय रुग्णालये यांनीदेखील आपल्या दवाखान्यात जन्मलेली बाळांची व मृत व्यक्तींची नोंद २१ दिवसाच्या आत ऑनलाईन पद्धतीने नोंद करावी़ याबाबतची माहिती आपआपल्या क्षेत्रीय कार्यालयातील अविरत केंद्रात दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत सदरची माहिती देणे बंधनकारक असल्याचे आरोग्य अधिकार्यांनी सांगीतले़ जन्म-मृत्यू नोंदणी केल्यास भविष्यात गैरसोय होणार नाही़ जन्म प्रमाणपत्रे बाळाची कायदेशीर ओळख मिळविण्यासाठी, शाळेत प्रवेशासाठी, जन्मस्थळ व वय सिद्ध करण्यासाठी, पारपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॅनकार्ड, मतदार यादीत नावनोंदणी, शिधापत्रिका नाव नोंदणी आदीसाठी महत्त्वपूर्ण ठरतात़ तर मृत्यू प्रमाणपत्राचा वापर मृत्यू झाल्याचा कायदेशीर पुरावा, मृत्यूचे दिनांक व ठिकाण सिद्ध करण्यासाठी, बँकेतील ठेवी व विम्याची रक्कम वारसांना मिळण्यासाठी, कुटूंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी होतो़ भविष्यात होणारी गैरसोय टाळण्यासाठी जन्म-मृत्यू नोंदणी वेळेत करण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले़