शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Pandemic Side Effect: पालकांनाे सावधान! कोरोनाने मानसिक तणावातून रोज ३१ मुलांची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 08:11 IST

सेव्ह द चिल्ड्रनचे उपसंचालक प्रभातकुमार यांनी सांगितले की, कोरोनाची साथ तसेच त्यामुळे शाळा बंद असणे अशा गोष्टींमुळे मुलांना विलक्षण एकाकीपणा जाणवू लागला होता. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : गेल्या वर्षी देशात दररोज सरासरी ३१ मुलांनी (१८ वर्षे वयाखालील) आत्महत्या केल्याची माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (एनसीआरबी)च्या अहवालातून उघड झाली आहे. त्यावर्षी ११,३९६ मुलांनी आत्महत्या केली. त्यात ५,३९२ मुले व ६००४ मुली होत्या. त्यातील अनेक मुलांनी कोरोना साथीमुळे उद्भवलेल्या मानसिक तणावातून आत्महत्या केल्या असाव्यात असे मानसोपचार तज्ज्ञांचे मत आहे.

या अहवालात म्हटले आहे की, २०२० साली देशात ११.३९६ मुलांनी आत्महत्या केली. २०१९ मध्ये ९६१३ मुलांनी आत्महत्या केली होती. २०१८ साली हाच आकडा ९,४१३ इतका होता. २०२० मध्ये २०१९ पेक्षा १८ टक्क्यांनी व २०१८ पेक्षा २१ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी कौटुंबिक समस्यांपायी ४,००६, प्रेमप्रकरणातून १,३३७, आजारी असल्याने १,३२७ जणांनी आत्महत्या केल्या. अन्य कृत्यामागे बेकारी, दिवाळखोरी, व्यंधत्व, अमली पदार्थांचे सेवन अशी इतर कारणे होती.

यासंदर्भात सेव्ह द चिल्ड्रनचे उपसंचालक प्रभातकुमार यांनी सांगितले की, कोरोनाची साथ तसेच त्यामुळे शाळा बंद असणे अशा गोष्टींमुळे मुलांना विलक्षण एकाकीपणा जाणवू लागला होता. 

शाळा बंद असल्याने एकाकीपणा nकोरोना साथीच्या काळात शाळा बंद असल्याने अनेक मुलांना घरीच राहावे लागले. त्यांचा मित्र, शिक्षक किंवा अन्य व्यक्तींबरोबरचा संवादच खुंटल्यासारखे झाले होते. त्यामुळे एक प्रकारचा एकाकीपणा आला. nत्यामुळेही मानसिक तणाव असह्य होऊन अनेक मुलांनी आत्महत्या केली असे बालकल्याणासाठी काम करणाऱ्या संस्थांचे मत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या