शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

फुप्फुस कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण ३० टक्के; महिलांमध्ये २० टक्के प्रमाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 08:36 IST

धूम्रपानाला दूर ठेवण्याचे तज्ज्ञांचे आवाहन

नागपूर : फुप्फुसांचा कर्करोग हा पहिल्या पाच जीवघेण्या आजारांपैकी एक आहे. दिल्ली, चेन्नई, बंगळुरूनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. जगात कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे. महिलांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण २० टक्के आहे. भारतात फुप्फुसांच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण सरासरी ९.८१ टक्के आहे. वेळीच उपचार घेतल्यास कॅन्सरचा रुग्ण बरा होऊ शकतो. तंबाखूच्या दुष्परिणामांच्या माहितीविषयी जनजागृती करण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.जगभरात फुप्फुसांच्या कर्करोगाच्या घटना वाढू लागल्या आहेत. सर्व प्रकारच्या कर्करोगांमध्ये या रोगाचे प्रमाण १४.४ टक्के आहे. भारतात दरवर्षी या रोगाचे सुमारे ६३ हजार नवीन रुग्ण आढळून येतात. नवीन ग्लाबोकॅन अहवालानुसार स्तन, गर्भाशय व मुख कर्करोगानंतर फुप्फुसांचा कर्करोग हा चौथ्या स्थानी आहे. फुप्फुसांचा कर्करोग असलेल्या भारतीय रुग्णांमध्ये तंबाखू हे मुख्य कारण ठरले आहे.याबाबत अधिक माहिती देताना कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुशील मानधनिया म्हणाले, धूम्रपान आणि फुप्फुसांचा कर्करोग यांचा जवळचा संबंध आहे. धूम्रपान करणाऱ्यांमध्ये हा आजार ८७ टक्के, तर अप्रत्यक्षरीत्या करणाऱ्यांमध्ये तीन टक्के आहे. या आजाराच्या रुग्णांच्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण म्हणजे उशिरा निदान होणे होय. याशिवाय चुकीचे निदान करून क्षयरोग झाल्याचे दाखविले जाते.या लक्षणांकडे दुर्लक्ष नकोदोन ते तीन आठवड्यांपर्यंत सुरू असलेला खोकला, खोकताना रक्त येणे, सतत छातीत दुखणे, श्वास घेताना किंवा खोकताना त्रास होणे किंवा वेदना होणे, थकवा वाटणे, भूक न लागणे किंवा अनपेक्षितपणे वजन कमी होणे, धाप लागणे किंवा श्वास घेताना दम लागणे आणि आवाज घोगरा होणे, या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.    - डॉ. सुशील मानधनिया, कर्करोगतज्ज्ञधूम्रपानामुळे आयुष्याची १५ वर्षे कमी होताततंबाखूचे व्यसन वाढतच चालले आहे. असेच राहिल्यास २०३० पर्यंत १० पैकी एक रुग्ण तंबाखूमुळे आजारी पडेल. धूम्रपानाच्या व्यसनामुळे आयुष्याची १५ वर्षे कमी होतात. भारतात दरवर्षी जवळपास १२ लाख कर्करोग रुग्णांची नोंदणी होते. यात सुमारे पाच लाख पुरुष व तीन लाख महिलांचा विविध कर्करोगाने मृत्यू होतो.    - डॉ. करतार सिंग, संचालक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल.