शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

631 उमेदवारांमध्ये रंगणार जि.प.चा रणसंग्राम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 05:00 IST

सर्वाधिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सर्वाधिक उमेदवार गोंदिया तालुक्यात आहे. याच तालुक्यातील विजयाचे समीकरण जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाबी कुणाकडे राहणार हे ठरविणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निवडणुका होणार की नाही यावरून अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून जिल्हा परिषदेच्या ४३ तर, आठ पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी २१ डिसेंबरला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण ६३१ उमेदवार रिंगणात असून याच उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी सर्वाधिक उमेदवार गोंदिया तालुक्यात आहे. याच तालुक्यातील विजयाचे समीकरण जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाबी कुणाकडे राहणार हे ठरविणार आहे. त्यामुळे या तालुक्यातील लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थामधील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने निवडणुका होणार की नाही यावरून अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे बुधवारपर्यंत अनेक उमेदवारांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली नव्हती. मात्र, बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला घेऊन दाखल केलेल्या याचिका फेटाळून लावल्या. त्यामुळे आता ओबीसी प्रवर्गाच्या जागा वगळून निवडणुका होणार हे स्पष्ट झाले. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपंचायतीसाठी १३ डिसेंबर हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे त्याच दिवशी निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात आले. पण सहा जागांवर काहींनी आक्षेप घेतल्याने यावर बुधवारी सुनावणी करण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आता अंतिमत: किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहे, याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या ४३ जागांसाठी २४३ तर पंचायत समितीच्या ८६ जागांसाठी ३८८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यांच्यात आता लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

ओबीसी बांधवांच्या भूमिकेकडे लक्ष- स्थानिक स्वराज्य संस्थामधील २७ टक्के ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने ओबीसी समाजबांधवांमध्ये रोषाचे वातावरण आहे. त्यातच निवडणुकीत मतदान करायचे की नाही यावर सध्या ओबीसी संघटनांचे मंथन सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

सर्वांचे लक्ष गोंदिया तालुक्याकडे - जिल्हा परिषदेच्या १४ आणि पंचायत समितीच्या २८ जागा गोंदिया तालुक्यात आहे. सर्वाधिक जागा याच तालुक्यात आहे. त्यामुळे या तालुक्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप आणि चाबी अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लढतीत जो बाजी मारेल तो जिल्हा परिषदेच्या सत्तेची चाबी निश्चित करेल हे निश्चित आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  

 

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषद