शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
3
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
4
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
5
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
6
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
7
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
8
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
9
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
10
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
11
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
12
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
13
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
14
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

जि.प.शाळांतील विद्यार्थ्यांची होणार ‘ऑनलाईन स्टडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 05:00 IST

इयत्ता व विषयानुसार दररोज २० प्रश्न गुगल फार्ममध्ये तयार करून बांते व उके यांच्याकडे सादर केले जातील. यासाठी प्रत्येकाला आपापल्या ईमेलचा वापर करावा लागेल.दिलेल्या इयत्ताची पुस्तके नसल्यास ई-बालभारतीमधून डाऊनलोड ककरावेत. प्रश्नावलीमधील सर्वच प्रश्न अभ्यासक्रमावरच आधारीत राहतील.दररोज दिवसाला वर्क फ्रॉम होम करून रात्री ९ वाजतापर्यंत जिल्ह्याच्या कोअर ग्रुपवर देण्यात आली.

ठळक मुद्देअभ्यासक्रमावर आधारित उपक्रम : संचारबंदीत वर्ग १ ते ८ च्या विद्यार्थ्यांचा अभ्यास

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : संपूर्ण भारत देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली आहे. राज्य शासनाच्या आदेशान्वये जिल्ह्यातील संपूर्ण शाळा या संचारबंदीच्या काळात बंद केल्या आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामीण तथा शहरी भागातील सर्वच विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. हे शैक्षणिक नुकसान कमी करण्यासाठी अभ्यासक्रमावरच आधारीत परीक्षा घेण्यासाठी शिक्षण विभागाने ‘आॅनलाईन स्टडी’ ही संकल्पना पुढे आणली आहे.जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांच्या कल्पनेतून जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये जिल्ह्यातील तंत्रस्रेही शिक्षकांच्या माध्यमातून व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया येथील आय टी विभागाचे विषय सहाय्यक गौतम बांते व दिनेश उके यांच्या प्रयत्नाने इयत्ता पहिली ते आठवीच्या भाषा व गणित विषयाची ऑनलाईन स्टडी हा उपक्रम संचारबंदीच्या काळात घेण्याचे नियोजन केले आहे. या शिक्षकांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून सर्व पालकांपर्यंत हा उपक्रम पोहचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.असे असणार परीक्षेचे स्वरूपइयत्ता व विषयानुसार दररोज २० प्रश्न गुगल फार्ममध्ये तयार करून बांते व उके यांच्याकडे सादर केले जातील. यासाठी प्रत्येकाला आपापल्या ईमेलचा वापर करावा लागेल.दिलेल्या इयत्ताची पुस्तके नसल्यास ई-बालभारतीमधून डाऊनलोड ककरावेत. प्रश्नावलीमधील सर्वच प्रश्न अभ्यासक्रमावरच आधारीत राहतील.दररोज दिवसाला वर्क फ्रॉम होम करून रात्री ९ वाजतापर्यंत जिल्ह्याच्या कोअर ग्रुपवर देण्यात आली. सर्व प्रश्नांचे एकत्रीकरण करून दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांसाठी गुगल लींक देण्यात येईल. ती लींक पालकांच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येईल. सर्व विद्यार्थ्यांचे व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करून त्यांच्यापर्यंत हे अभ्यासक्रमावर आधारीत उपक्रम सर्वांपर्यंत पोहचेल.तंत्रस्रेही शिक्षकांच्या गटात यांची निवडजिल्हास्तरावर तंत्रस्रेही शिक्षकांचा या परीक्षेसाठी गट तयार करण्यात आला. त्यांना अभ्यासक्रमावर आधारीत करण्यासाठी विषय व वर्ग देण्यात आला आहे. राजेश नागरिकर यांना वर्ग १ ली चा भाषा व गणित, हुमेंद्र चांदेवार यांना वर्ग २ री चा भाषा व गणित, विलास लंजे यांना वर्ग ३ री चा भाषा व गणित, आनंद सरवदे यांना ४ थी ची भाषा, देवेंद्र बरैया यांना ४ थी चे गणित, भाष्कर नागपुरे यांना ५ वी ची भाषा, अभय बिसेन यांना ५ वी चे गणित, सुरेश चव्हाण यांना ६ वी ची भाषा, सचिन धापेकर यांना ६ वी चे गणित,जीवन आकरे ७ वी ची भाषा, वाघदेवे ७ वी चे गणित, विलास डोंगरे ८ वी ची भाषा, कहालकर ८ वी चे गणित विषयासाठी त्यांची निवड झाली आहे.जिल्ह्यातील सर्व पालकांसाठी दररोज सकाळी ९ वाजता गुगल लिंकद्वारे प्रश्नावली देण्यात येईल.सर्व वर्ग शिक्षकांच्या माध्यामातून पालकांच्या ग्रुपवर लिंक देऊन सर्व मुलांना या उपक्रमात सहभागी करण्यात येत आहे. दररोज नवनवीन प्रश्न देण्यात येतील. सर्व मुलांचे निकाल देखील ग्रुपवर देण्यात येणार आहे. शिक्षण विभागातील सर्व यंत्रणेने या उपक्रमाला यशस्वी करावे.- राजकुमार हिवारे,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) गोंदिया.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाonlineऑनलाइन