शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईवर झेडपीने झटकले हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:10 IST

भूजल सर्वेक्षण विभागासह जिल्हा प्रशासनाने सुध्दा यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या बिकट असण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावर आतापासूनच उपाय योजना सुरू करण्याचे निर्देश दिले होते.

ठळक मुद्देबोअरवेलच्या सुट्या सामानांचा अभाव : निधीचाही ठणठणाट, पाणी टंचाईची समस्या बिकट

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भूजल सर्वेक्षण विभागासह जिल्हा प्रशासनाने सुध्दा यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या बिकट असण्याची शक्यता वर्तविली होती. त्यावर आतापासूनच उपाय योजना सुरू करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने हा मुद्दा गांभिर्याने घेतलेला नाही. टंचाई निवारणार्थ उपाय योजना करण्याच्या विषयावर हा विभाग पूर्णपणे बिनधास्त आहे.जिल्ह्यात साधारणात: ३ सप्टेंबरपर्यंत १३०० मि.मी. पाऊस पडतो. पण यंदा केवळ ६५८ मि. मी. पाऊस झाला. परिणामी तिव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. ज्यावर्षी १३०० मि. मी. पेक्षा जास्त पडतो तेव्हाही ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणविते. मात्र यंदाची परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेने यावर आतापासून उपाय योजना करण्याची गरज होती. परंतू अद्यापही या विभागाने पाणीे टंचाई निवारणार्थ कुठलीच उपाय योजना केली नाही.विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या देखभाल दुरूस्ती फंडात काहीच निधी शिल्लक नसल्याने या विभागाचे अधिकारी हातावर हात ठेवून आहेत. जिल्हा नियोजन व विकास मंडळाने यासाठी १ कोटी रुपये उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत फारच कमी प्रमाणात पाऊस झाला. परिणामी प्रकल्प सुध्दा कोरडे पडले आहेत. तर काही गावांमध्ये आतापासूनच पाणी टंचाईची ओरड होत आहे. भूजल सर्वेक्षण विभागानेही यंदा पाणी टंचाईचे संकेत दिले आहे. मात्र यानंतर जिल्हा प्रशासनाने उपाय योजना सुरू केल्या नसल्याची माहिती आहे.सहा महिन्यांपासून सुट्या सामानांचा अभावजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे दरवर्षी पाणी टंचाईचा आराखडा तयार केला जातो. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा जिल्ह्यात वेगळे चित्र आहे. पाणी टंचाईवर उपाय योजना म्हणून विंधन विहिरींचे पाईप व सुटे सामान मागील ६ महिन्यांपासून जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाकडे उपलब्ध नाहीत. पाईप आणि सुट्या सामानांची खरेदी ज्या फंडातून केली जाते. त्या देखभाल दुरूस्ती फडांत सध्या निधीच उपलब्ध नसल्याचे सांगत या विभागाच्या अधिकाºयांनी हातवर केले आहेत.सिंचन प्रकल्पात केवळ १३ टक्के साठाजिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुनलेत केवळ ५० टक्के पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील उन्हाळी धानपिक सुध्दा धोक्यात आले आहे. सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील लहान, मोठ्या आणि मध्यम सिंचन प्रकल्पात केवळ १३ टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे त्याचा भूजल पातळीवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी उन्हाळ्यात जिल्हावासीयांना पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.भूजल पातळी दोन मीटरने खालावलीभूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील १६४ निरीक्षण विहिरींची पाण्याची पातळी मोजली. त्यात भूजल पातळी दोन मीटरने खालावली असल्याची बाब पुढे आली आहे. विशेष म्हणजे डिसेंबर महिन्यात मागील पाच वर्षांत प्रथमच भूजल पातळी दोन मीटरने खालावल्याचे अधिकाºयांनी सांगितले.