शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या एकीच्या बळाने जि.प.सीईओची गेली विकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जि. प.वर प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांचा कुठलाच वचक नसल्याने काही अधिकारी मनमर्जी कारभार करीत आहे. आमदारांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डांगे यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले. दवनीवाडा येथील शाळा बांधकामाचे चौकशी प्रकरण असो वा शिक्षकांच्या निलंबनाचा विषय त्यांनी नेहमीच एकांगी भूमिका घेतली. हीच भूमिका त्यांना भोवली.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील दोन महिन्यांपासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप डांगे विरुद्ध आणि आमदार असा गुप्त संघर्ष सुरू होता. या संघर्षात शिक्षक आणि ग्रामसेवकांच्या आंदाेलनाची भर पडली. डांगे यांनी आमदारांवर वरचढ होण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वरचढपणा करणे त्यांना भाेवला. त्यामुळे जिल्ह्यातील चारही आमदारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना गाठून डांगे यांची थेट तक्रार केली.  यानंतर गुरुवारी (दि.२७) डांगे यांच्या बदलीचे आदेश धडकले. त्यामुळे आमदारांचे एकीचे बळ अन् सीईओंची विकेट गेल्याचा अनुभव जिल्हावासीयांना आला. कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर गेली आहे. त्यामुळे जि. प.वर प्रशासकराज सुरू आहे. त्यामुळे पदाधिकारी आणि सदस्यांचा कुठलाच वचक नसल्याने काही अधिकारी मनमर्जी कारभार करीत आहे. आमदारांनी केलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करून डांगे यांनी स्वत:वरच संकट ओढवून घेतले. दवनीवाडा येथील शाळा बांधकामाचे चौकशी प्रकरण असो वा शिक्षकांच्या निलंबनाचा विषय त्यांनी नेहमीच एकांगी भूमिका घेतली. हीच भूमिका त्यांना भोवली. त्यातच ग्रामसेवकांचे निलंबन प्रकरणसुद्धा चांगलेच भोवले. जि. प.मुख्य कार्यकाऱ्यांविरुद्ध ग्रामसेवकांनी प्रथमच एवढी उघड भूमिका घेतली. याचा संदेशसुद्धा मुंबईपर्यंत गेला. शिवाय त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून काही वादग्रस्त प्रकरणे भोवली. केवळ विरोधी नव्हे, तर सत्ता पक्षाच्या आमदारांनीसुद्धा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्र्यांसमोर डांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. तेव्हापासूनच त्यांच्या बदलीचे वारे वाहू लागले होते. त्यांच्या बंगल्यावरील बागेत एका अधिकाऱ्याने टाकलेल्या सेंद्रिय खताच्या प्रकरणाची चर्चासुद्धा चांगली होती. ही सर्वच प्रकरणे डांगे यांच्या बदलीस कारणीभूत ठरली. असो, पण शेवटी या निमित्ताने जिल्ह्यातील चारही विद्यमान आमदारांचे एकीचे बळ फळाला आले म्हटल्यास वावगे होणार नाही. हीच भूमिका यापुढे कायम ठेवल्यास निश्चितच जिल्ह्याच्या विकासाची गाडी अधिक वेगाने धावेल हे कुणीही नाकारू शकत नाही. 

त्या प्रकरणाची चौकशी कराच केवळ विरोधी पक्षाचे नव्हे, तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनीसुद्धा काही प्रकरणावरून मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. आता त्यांची बदली झाली म्हणून या प्रकरणावर पडदा न टाकता या प्रकरणाची सखोल चौकशी करून एकदा ‘दूध का दूध और पानी का पानी’ होऊन जाऊ द्या.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषद