शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

समाजाच्या विकासासाठी युवकांनी पुढे यावे

By admin | Updated: November 6, 2016 01:02 IST

गुजराती राष्ट्रीय केलवनी मंडळ व गोंदिया गुजराती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी स्रेहमिलन कार्यक्रम

प्रफुल्ल पटेल : गुजराती समाजाचा दिवाळी स्रेहमिलन गोंदिया : गुजराती राष्ट्रीय केलवनी मंडळ व गोंदिया गुजराती समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी स्रेहमिलन कार्यक्रम आनंद पुरूषोत्तम वसंत गुजराती बालक मंदिर येथील सभाभवनात पार पडले. याप्रसंगी समाजबांधवांना मार्गदर्शन करताना समाजाच्या विकासासाठी युवा वर्गाने पुढे येण्याची गरज आहे. तसेच समाजासाठी समाजवाडीचे पुनर्बांधकाम केले जाईल, असे खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले. या वेळी विद्यार्थी व शिक्षिकांनी भजन सादर करून वातावरण भक्तीमय बनविले. पंडित चंद्रकांत व्यास यांच्या आशीर्वचनाने नवीन वर्षाच्या कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सकाळी कार्यकारिणी समिती व ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व सचिव हरिहरभाई पटेल यांनी सर्वांना दिवाळी व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी प्रामुख्याने अरविंद पटेल, दीपम पटेल, विजय शेठ, हिम्मत राठोड, डॉ. संघाणी, सुरेश पारेख, हसमुख पटेल, दिनेश ई. पटेल, मुकेश पटेल, दिनेश ज. पटेल, वृजलाल चावडा, निलेश पटेल, दीपक पटेल, प्रकाश काथराणी, प्रफुल्ल चावडा, जयंतीलाल परमार तसेच युवा सदस्यांमध्ये प्रजय पटेल, जयदीप पटेल, प्रशांत वडेरा, यतीन परमार, तिमीर पटेल, पिनल पटेल, इंद्रेश निर्मल, विनय पटेल, विशाल चंदाराणा आदी उपस्थित होते. या वेळी केलेल्या दुधाच्या व्यवस्थेत चिराग पटेल यांचे विशेष योगदान होते. कार्यक्रमाचे संचालन गुजराती राष्ट्रीय केलवनी मंडळाचे सचिव जयेश पटेल यांनी केले. या वेळी समाजाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार सहसचिव सुधीर राठोड यांनी मानले. यानंतर महिलांचे कार्यक्रम झाले. याप्रसंगी वर्षा पटेल यांनी आपले सासरे स्व. मनोहरभाई पटेल यांच्या कार्यांचा उल्लेख करीत प्रफुल्ल पटेल यांच्याद्वारे गुजरातमधील विविध जिल्ह्यात केलेल्या कार्यांचा उल्लेख केला. समाजाची एकता व संघटन यावर त्यांनी भर दिला. या वेळी पूजा शाह, अर्पिता चंदाराणा, मीरा वडेरा, प्रीती पटेल, श्वेता वडेरा यांनी सभेला संबोधित केले. संचालन व आभार किंजल मेहता यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने गुजराती समाजातील महिला उपस्थित होत्या.(प्रतिनिधी)