बाराभाटी : प्रियदर्शनी सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्ताने फुले, शाहू, आंबेडकर युवा साहित्य संमेलन दि. २८ मार्च २०१५ ला स्थानिक ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष जेष्ठ आंबेडकर विचारवंत सत्यजीत मौर्य असून उद्घाटक सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, खा. नाना पटोले, प्रमुख पाहुणे मोरेश्वर मेश्राम भंडारा, आ. मिलींद माने, अशोक रामटेके, दिलवरभाई, नितीन गजभिये नागपूर, आ. बाळा काशिवार साकोली, आ. संजय पुराम देवरी, आ. विजय रहांगडाले तिरोडा, दिलीप बंसोड, दयाराम कापगते राहणार आहेत.सदर कार्यक्रमामध्ये ग्रामीण भागातील व्यक्ती आपल्या बुध्दीच्या जोरावर नोकरी मिळविली अशा सर्व श्रेणीमधील लोकांचे सत्कार समारंभ करण्यात येणार आहे. तसेच दुपारी १२ वाजता परिसंवाद, विषय प्रियदर्शी सम्राट अशोक आणि स्वर्णीय प्रबुध्द भारत काल, आज आणि उद्या यावर वक्ते अॅड. संदेश भालेकर, प्रा. प्रदिप भानसे, प्रा. संजय मगर, हरिचंद्र लाडे, अनिल कानेकर, वैशाली रामटेके, डॉ. युवराज मेश्राम, टी.एस. माटे हे मार्गदर्शक करणार आहेत. सदर कार्यक्रमात व्हिएतनाम, जपान, थॉयलंड, श्रीलंका, ब्रम्हदेश येथे सुपरहिट झालेला हिंदी चित्रपट प्रथमच भारतामध्ये प्रदर्शित होत आहे. सायंकाळी ७ वाजता व रात्री १० वाजता कव्वालीचे मेजवानी आयोजन आहे. सदर कार्यक्रमाला सहभाग आवाज चॅनल प्रितम बुलंकुडे, अमन कांबळे, रामा चुऱ्हे, ठवरे, मुन्नाभाई नंदागवळी लोकमत व पृथ्वीराम खोब्रागडे हे प्रसिध्द प्रमुख व समता सैनिक दल शाखा बाराभाटी व संर्पू तालुका आणि बाराभाटी, येरंडी, सुकडी, नवेगाव, अर्जुनी-मोरगाव, पिंपळगाव, निमगाव, बोंडगाव सहकार्य करणार आहेत असे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व आयोजक विनोद माने (साहित्य प्रचारक) यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
बाराभाटीत २८ ला युवा साहित्य संमेलन
By admin | Updated: March 26, 2015 01:07 IST