शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत बसल्यानंतरही मिळणार आरक्षित तिकीट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2022 05:00 IST

रेल्वे हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. हॅन्ड हेल्ड टर्मिनल हे छोटेशे यंत्र आता टीसीला दिले जाणार आहे. यामुळे टीसीला गाडीत आरक्षित चार्ट घेऊनसुद्धा फिरण्याची गरज भासणार नाही. यामुळे कागदाची सुध्दा बचत होणार असून पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे. सध्या ही सुविधा राजधानीसह काही गाड्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपण रेल्वेतून प्रवास करीत आहात आणि आपली तिकीट आरक्षित झाली नसेल तरी आता फारशी काळजी करण्याची गरज नाही. गाडीतील टीसीशी संपर्क साधून पुढील ज्या स्थानकावरून आरक्षित तिकीट मिळू शकेल याची माहिती प्रवाशांना मिळणार आहे. यासाठी रेल्वे हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. हॅन्ड हेल्ड टर्मिनल हे छोटेशे यंत्र आता टीसीला दिले जाणार आहे. यामुळे टीसीला गाडीत आरक्षित चार्ट घेऊनसुद्धा फिरण्याची गरज भासणार नाही. यामुळे कागदाची सुध्दा बचत होणार असून पर्यावरणाचे संवर्धन करण्यास मदत होणार आहे. सध्या ही सुविधा राजधानीसह काही गाड्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे. पण दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही. हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) हे मशीन रेल्वे बोर्डाकडून मिळाल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पुढील स्थानकावरून आरक्षित तिकिट उपलब्ध असल्यास ती गाडीतूनच आरक्षित करता येणार आहे. 

गोंदियाला मिळणार ८५ हॅन्ड हेल्ड टर्मिनल मशीन 

रेल्वे विभागाने प्रवाशांच्या विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. याच अंतर्गंत गाडीतच आरक्षित तिकीट बुकींग करण्याची सुविधा हॅन्ड हेल्ड टर्मिनल सिस्टिम अंतर्गत उपलब्ध करून दिली जाणार आहे. हॅन्ड हेल्ड टर्मिनल हे मशीन गाडीतील टीसीकडे असणार आहे. या मशीनच्या मदतीने टीसी कोणत्या रेल्वे स्थानकावरून आरक्षित तिकीट उपलब्ध होऊ शकेल याची माहिती देणार आहे. त्यामुळे प्रवासा दरम्यान आरक्षित तिकीट प्रवाशांना बुक करता येणार असल्याने त्यांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. 

हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) या मशिनमध्ये गाडीच्या आरक्षित जागांची संपूर्ण माहिती असणार आहे. तर काही रेल्वे स्थानकांना आरक्षित तिकिटांचा कोटा ठरवून दिला असून बरेचदा तो रिकामा असतो. मात्र, एचएचटीच्या मदतीने गाडीतून प्रवास करताना कोणत्या स्थानकावरून आरक्षित तिकीट मिळू शकेल याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. माहिती मिळताच ऑनलाईन आरक्षित तिकीट बुकींग करता येणार आहे.

हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) या प्रणालीची अंमलबजावणी करण्याबाबत बोर्डाकडून आदेश आणि मशीन उपलब्ध झाले नाहीत. गोंदियाला ८५ मशीन मिळणार आहेत. यासंदर्भातील निर्देश मिळताच अंमलबजावणी केली जाईल.- ए. के.रॉय, जनसंपर्क अधिकारी

प्रवाशांची अडचण हाेणार दूर हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) या प्रणालीची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रवाशांना प्रवास दरम्यान गाडीत तिकीट आरक्षित करणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट आरक्षित करण्यासाठीचा थोडा मनस्तापसुध्दा कमी होणार आहे. 

हॅन्ड हेल्ड टर्मिनल (एचएचटी) या प्रणालीची अंमलबजावणी रेल्वे बोर्डाकडून लवकरच केली जाणार आहे. हे मशीन उपलब्ध झाल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सुरुवातीला काही एक्सप्रेस गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू केली जाणार आहे. 

 

टॅग्स :railwayरेल्वे