शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण वर्गखोल्यांमध्ये शाळा भरवायची कशी तुम्हीच सांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

विद्यार्थ्यांची शैक्षणिक कार्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी जानेवारी २०२० ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जोडून लेखी निवेदन देण्यात आले, परंतु संबंधित विभागाने दखल घेतली नाही. जीर्ण झालेल्या शाळेच्या खोल्या पडून विद्यार्थ्यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

चरण चेटुलेलोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी :  अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी येथील ४ किमी अंतरावर असलेल्या ग्राम करांडली येेथे जिल्हा परिषदेची १ ते ४ पर्यंतची प्राथमिक शाळा आहे. या शाळेचे बांधकाम विटामाती व कवेलूचे असल्यामुळे जुनी झाल्याने भिंतीना भेगा पडून पावसाळ्याच्या दिवसात खोल्यांमध्ये पाणी गळून चार वर्गाची बैठक व्यवस्था दोन खोल्यांमध्ये करुन शैक्षणिक कार्य करण्यात येतात. त्यामुळे जीर्ण झालेल्या वर्गखोल्यांमध्ये बसवून शिकवायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक कार्याची गैरसोय टाळण्यासाठी नवीन खोल्यांचे बांधकाम करण्यासाठी जानेवारी २०२० ला पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जोडून लेखी निवेदन देण्यात आले, परंतु संबंधित विभागाने दखल घेतली नाही. जीर्ण झालेल्या शाळेच्या खोल्या पडून विद्यार्थ्यांची जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन नवीन शाळेच्या खोल्या बांधण्याची मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांसह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हितेश शहारे यांनी केली आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा इमारती सुंदर बोलक्या आणि डिजिटल करण्याच्या नादात शासन जुन्या इमारत खोल्यांचे स्ट्रक्चर ऑडिट करुन नवीन बांधकाम करण्याचा विसर पडल्याचे ग्राम करांडली येथील प्राथमिक शाळेच्या खोल्यांकडे पाहिल्यानंतर येत आहे. 

शाळा भरविण्याची समस्या - अलीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने १७ ऑगस्ट २०२१ पासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्जुनी मोरगाव तालु्क्यातील करांडली येथील १ ते ४ पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा असून शालेय इमारत जुनी झाल्यामुळे जीर्ण होऊन खोल्यांच्या भितींना भेगा पडून पावसाळ्याच्या दिवसात कवेलूमधून पाणी गळत असते. शाळा सुरु झाल्यास या शाळेत मुलांना शाळा पडण्याच्या भीतीमुळे पालक शाळेत पाठवतात किंवा नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. गावकऱ्यांच्या पत्राची दखल नाही -  गेल्यावर्षी ४ वर्गाची विद्यार्थी संख्या दोन खोल्यांमध्ये बैठक व्यवस्था करुन विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना अध्यापन कार्य पार पाडावे लागत असे. विद्यार्थ्यांचे भविष्य व हित लक्षात घेऊन नवीन खोल्यांच्या बांधकामाची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचा ठराव जोडून लेखी निवेदनाद्वारे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गोंदिया यांच्याकडे नागरिकांनी अनेकदा मागणी केली आहे, परंतु प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळे नवीन खोल्या बांधकामाची दखल घेतली नाही. कदाचित जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असती तर कोरोनामुळे बंद असलेल्या कालावधीत शाळेच्या खोल्यांचे बांधकाम करता आले असते, परंतु प्रशासनाची शिक्षण क्षेत्रावर असलेली अनास्था कारणीभूत असल्याचे बोलले जाते.

 

टॅग्स :Schoolशाळा